नशीब असावे तर असे! ऑर्डर केला iPhone 13 डिलिव्हर झाला iPhone 14

| Updated on: Oct 06, 2022 | 6:54 PM

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन हे काय असते ते एकाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळले आहे. अशी फसवणूक तुमच्या आमच्या सगळ्यांसोबत होवो..

नशीब असावे तर असे! ऑर्डर केला iPhone 13 डिलिव्हर झाला iPhone 14
आयफोन 14
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ऑनलाईन शॉपिंगमध्ये (Online Shopping) फसवणूक झाल्याच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकतो.  आयफोन आणि लॅपटॉप ऑर्डर केल्यावर साबणाची डिलेव्हरी मिळायचे आपण ऐकले असेलच. मात्र एका ग्राहकाला जगावेगळा अनुभव आला आहे.  iPhone 13 च्या बुकिंगवर एका ग्राहकाला चक्क iPhone 14 ची डिलेव्हरी मिळाली. होय, हे प्रकरण सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकांनी त्या व्यक्तीला जगातला नशीबवान अशी उपमा दिली आहे.

काय आहे प्रकरण

4 ऑक्टोबर रोजी, DigitalSphereT नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने दोन फोटो  शेअर केले. त्याच्या एका फॉलोअरने फ्लिपकार्टवरून आयफोन 13 ऑर्डर केला होता, परंतु जेव्हा फोनची डिलेव्हरी मिळाली तेव्हा त्याला बॉक्समध्ये आयफोन 13 ऐवजी आयफोन 14 मिळाला.  या पोस्टनंतर हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या पोस्टला 8 हजारांहून अधिक लाईक्स आणि सुमारे 500 रिट्विट्स मिळाले आहेत.

नशीब असावे तर असे

DigitalSphereT च्या या ट्विटनंतर अनेक यूजर्स सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेक यूजर्सनी लिहिले की हे दोन फोन इतके समान आहेत की कोणीही गोंधळून जाईल. एका यूजरने लिहिले की, हे दोन फोन पाहिल्यानंतर ॲपलही गोंधळले आहे. अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की ज्या व्यक्तीला आयफोन 13 ऐवजी आयफोन 14 मिळाला आहे तो खूप भाग्यवान आहे.

हे सुद्धा वाचा

एकाला मिळाले होते साबण

फ्लिपकार्टवरून लॅपटॉप ऑर्डर केल्यावर अहमदाबाद आयआयएमची विद्यार्थिनी यशस्वी शर्माला डिलिव्हरी बॉक्समध्ये लॅपटॉपऐवजी कपडे धुवायचा साबण मिळाला होता. याबाबत त्यांनी फ्लिपकार्ट कस्टमर केअरकडे तक्रार केली असता त्यांनी आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. यशस्वी यांनी त्यांच्याकडे डिलिव्हरीचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचेही सांगितले तरी कंपनीने ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत यशस्वीला नकार दिला.