ही मुलगी करते चित्रविचित्र मेकअप, बघून झोप उडेल झोप!

| Updated on: Jan 14, 2023 | 5:09 PM

सध्या अशाच एका कलाकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याने आपल्या विचित्र कलेने लोकांची झोप उडवलीये.

ही मुलगी करते चित्रविचित्र मेकअप, बघून झोप उडेल झोप!
MAKEUP VIDEO
Image Credit source: Social Media
Follow us on

जगात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. सोशल मीडियावर दररोज असे व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात लोक आपलं कौशल्य दाखवताना दिसतात, जे पाहून आपण थक्क होतो. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कला आणि कलाकारांशी संबंधित व्हिडिओही पाहायला मिळतात, ज्यात कधी कधी विचित्र कलाही पाहायला मिळते. सध्या अशाच एका कलाकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याने आपल्या विचित्र कलेने लोकांची झोप उडवलीये. या कलाकाराला ‘मॅजिशियन ऑफ मेकअप’ म्हणूनही ओळखले जाते.

खरं तर मुलीने आपल्या पायांना पेंटिंग बोर्ड बनवून त्यावर इतकी विचित्र कला तयार केली आहे की बघणारेही थक्क होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलीने किती सुंदरपणे आपल्या पायाचे टोमॅटो आर्टमध्ये रूपांतर केले आहे. इतकं सुंदर पेंटिंग आहे की तिचे पाय टोमॅटो आहेत असे दिसते.

याशिवाय तिने आपल्या पायावर केळी आणि ब्रेडचं चित्रंही काढलंय. हे सगळं अगदी खरंखुरं वाटतं. त्याचप्रमाणे या मुलीने इतरही अनेक प्रकारच्या कलाप्रकारांची निर्मिती केली आहे, जी अतिशय विचित्र दिसतात.

मात्र, अशी कला तयार करणे हे सोपे काम नाही, जे कोणीही करू शकेल. तिने ही कला इतकी सुंदर पणे साकारली आहे की लोक गोंधळून जातायत नेमकं हे आहे काय हीच त्या मुलीची प्रतिभा आहे.

ही सुंदर, पण विचित्र कला बनवणाऱ्या मुलीचं नाव आहे कॅनडाची असलेली मिमी चोई. तिने मेकअप आर्टमध्ये प्राविण्य मिळवले आहे. ती अशी कला निर्माण करते की, खरं खोटं यात फरक करणे अवघड होऊन बसते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ खुद्द मिमी चोईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 14 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 95 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की ही कलेची एक वेगळी पातळी आहे, तर कुणी म्हणतंय की ही कला विचित्र आहे, विलक्षण आहे.