मुंबई: शहरातंर्गत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी (District-State) Uber टॅक्सी बुक केल्याचं तुम्ही ऐकंल असेल. पण एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी Uber टॅक्सी बुक केल्याचं तुम्ही कधी ऐकलय का? तुम्ही म्हणालं, हे कसं शक्य आहे? तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटतेय, ती प्रत्यक्षात घडलीय. एका व्यक्तीने परदेशात जाण्यासाठी चक्क Uber टॅक्सी बुक केली. टॅक्सीने आपण जास्तीत जास्त किती लांब जाऊ शकतो? याची त्या व्यक्तीला चाचपणी करायची होती. कुठलाही टॅक्सी (cab) चालक यासाठी तयार होणार नाही, असं त्याला वाटलं. पण जेव्हा एका Uber टॅक्सी ड्रायव्हरने परदेशात जाण्यासाठी होकार दिला, तेव्हा त्याला धक्का बसला.
ब्रिटनमध्ये रहाणाऱ्या या व्यक्तीचं नाव जॉर्ज क्लार्क आहे. जॉर्ज एक फेमस टिकटॉकर आहे. TikTok वर त्याचे 10 लाखापेक्षा पण जास्त फॉलोअर्स आहेत. नुकताच जॉर्ज क्लार्कने त्याचा अनुभव सोशल मीडियावर सांगितला. त्याचा तो व्हिडिओ अल्पावधीत व्हायरल झाला.
मी रात्री उशिरा ब्रिटनच्या Bristol शहरातून डेन्मार्कला जाण्यासाठी कॅब बुक केली. एका Uber चालकाने जेव्हा या प्रवाासासाठी होकार दिला, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. इतक्या लांबच्या प्रवासासाठी कोणी ड्रायव्हर तयार होईल, याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. TikTok व्हिडिओमध्ये जॉर्जने ही सर्व माहिती दिली. ‘द मिरर’ ने हे वृत्त दिलं आहे.
तो Uber ड्रायव्हर डेन्मार्कला कसा जाणार? त्या बद्दल मात्र स्पष्टता नव्हती. जॉर्जने Uber App वर जो मार्ग सुचवला होता, तो उत्तर समुद्रमार्गे जाणारा होता. एका वेबसाइटनुसार ब्रिटन ते डेन्मार्क हे अंतर 1808 किमी लांब आहे. ड्रायव्हर डेन्मार्कपर्यं कसा जाणार? हा प्रश्नच होता. राईड Accept केल्यानंतर जॉर्जने लगेच ती कॅन्सलही केली.