लखनऊ | 31 ऑगस्ट 2023 : पाणीपुरी खायला आवडत नाही, अशी व्यक्ती विरळाच. जर तुम्हालाही पाणीपुरी (panipuri) आवडत असेल तर बाजारात एक प्लेटचा काय रेट आहे, तेही माहित असेलच. 10 रुपयांत किती पाणीपुरी मिळते, याचीही तुम्हाला कल्पना असेलच. पण एक दबंग युवक एवढ्याच पैशांत सात गोलगप्पे खाण्यावर अडून राहिला. मात्र त्यानंतर जे झालं ते पाहून सर्वच हैराण झाले. पुढल्याच क्षणी दुकानदार आणि कस्टमरमध्ये भररस्त्यात फिल्मी स्टाइल हाणामारी (dispute) झाली ना ! ते दृष्य बघून सर्वांचेच डोळे विस्फारले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या हमीरपुर येथे घडल्याचे समजते.
पाणीपुरीवरून झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ एकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की दोघे जण भररस्त्यात एकमेकांवर तुटून पडले असून मारहाण करत आहेत. रस्त्यावरून जाणारे येणारेही त्यांचं भांडण बघत आहेत, पण त्या दोघांना काहीत फरक पडलेला नाही. दोघेही जणू कुस्तीचा सामना सुरू असल्यासारखे भांडताना दिसत आहेत.
हाच तो व्हिडीओ
Kalesh b/w a Golgappa seller and Customer over 10rs me 7 golgappa hi kyu? pic.twitter.com/kpa0kIeiQ8
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 30, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमीरपूरमध्ये रामसेवक नावाचा तरुण पाणीपुरी विकतो. १० रुपयांना ५ पुऱ्या असा त्याचा रेट आहे. मात्र गावातील एका दबंग तरुणाने त्याला सात पाणीपुऱ्या द्यायला सांगत, त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला व त्याचे रुपांतर मारामारीत झाले, जे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या व्हिडीओवर अनेक लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत.