तिरुवनंतपुरम: सध्या सोशल मीडियावर विचित्र पिवळ्या रंगातील जीन्सची काही छायाचित्रे व्हायरत होत आहे. जीन्सचे हे फोटो बघून सुरुवातीला वेगळीच शंका येते. मात्र, बारकाईने पाहिल्यास हा तुम्ही समजताय तो प्रकार नसल्याचे तुमच्या लक्षात येईल. तर जीन्सचे हे फोटो केरळातील कन्नूर विमानतळावरचे आहेत. जीन्सवर लागलेला विचित्र पिवळा रंग हा दुसरे तिसरे काही नसून सोनं आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. कन्नूर विमानतळावरील अधिकाऱ्यांची अवस्था अशीच काहीशी झाली होती. (Gold Smuggling unique technique at Kannur airport)
कन्नूर विमातळावर सोमवारी सकाळी आलेल्या विमानातून एक प्रवासी उतरला. विमातळावरुन आतमध्ये प्रवेश करताना असणारा मेटल डिटेक्टर आणि इतर सुरक्षा उपकरणे पार करून हा प्रवासी पुढे आला होता. मात्र, त्याने घातलेली विचित्र जीन्स सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. या जीन्सवर पिवळ्या रंगाचा विचित्र वॉश होता. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या (AIU) अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची जीन्स बारकाईने पाहिली तेव्हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ही जीन्स अत्यंत कलात्मकतेने तयार करण्यात आली होती. सोने दडवून ठेवण्यासाठी जीन्सची विशिष्ट प्रकारे रचना करण्यात आली होती. या जीन्समध्ये दोन वेगवेगळे थर होते. त्यामध्ये सोन्याची पेस्ट लावण्यात आली होती. सोन्याचा हा थर अत्यंत पातळ असल्याने तो एखाद्या रंगाप्रमाणे दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात या जीन्समध्ये 302 ग्रॅम म्हणजे साधारण तीन तोळे सोने लपवण्यात आले होते. सोन्याची पेस्ट मेटल डिटेक्टरमध्ये पकडली जात नाही. त्यामुळे सोन्याच्या तस्करीसाठी या नव्या पद्धतीचा उपयोग होत आहे.
संबंधित बातम्या:
कमरपट्ट्यातून सोन्याची तस्करी, तीन किलो सोन्यासह दोघांना अटक
प्रवाशाच्या केसांना हात लावला अन् सोनं पडायला लागलं, जाणून घ्या नेमका प्रकार काय?
(Gold Smuggling unique technique at Kannur airport)