मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ आवडीने पाहिले जातात यातील काही व्हिडिओ हे थरारक असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तुमचा मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका माकडाची चांगलीच धांदल उड्ल्याचे दाखवण्यात आले आहे.आपला हात एका माणसाने पकडला असल्याचे समजताच माकडाच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानकपणे बदलले आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडाओ अतिशय मजेदार आहे. व्हिडीओमध्ये एका माणसाने छोट्याशा माकडाचा हात पकडल्याचा दिसतेय. या छोट्या माकडाच्या बाजूला उभे असलेले दुसरे माकड त्याच्यापासून दूर गेल्याचे दिसतेय. दूर गेलेल्या माकडाकडे हे छोटेसे माकड पाहत आहे. याच माकडाचा एक हात माणसाने पकडलाय. काही क्षणानंतर छोट्याशा माकडाने समोर वळून पाहिले आहे. आपला हात एका माणसाच्या हातामध्ये असल्याचे दिसताच हे माकड चांगलेच गोंधळून गेलेय. काय करावे हे त्याला समजत नाहीये.
व्हिडीओतील माकड स्वत:चा हात समोरच्या माणसापासून सोडवून घेण्यासाठी धडपडत आहे. त्याच्या चेहर्यावरील हावभाव लगेच बदलले आहेत. आपल्या दुसऱ्या हाताने माणसाच्या तावडीत सापडलेला हात ते छोटे माकड सोडवू पाहात आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये माकडाचे बदलेले हावभाव पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.
पाहा व्हिडीओ :
हा व्हिडीओ तुम्हाला इंस्टाग्राम वर पाहता येईल. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी प्राण्यांना अशा प्रकारे त्रास देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी माकडाची चांगलीच फजिती झाली, असे म्हणत व्हिडीओला लाईक केले आहे, सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :