बाब्बो! एक दादला, त्याच्या पंधरा बायका अन् मुलं 107; कारण ऐकाल तर भुवया उंचावतील

| Updated on: Sep 08, 2022 | 8:13 PM

आता तुम्ही म्हणाल, डेव्हिडरावांना एवढ्या बायका आहेत. तर त्यांच्यात भांडणं होत असतील. त्या खूश नसतील. तर तुमचा अंदाज चुकलाय. त्याच्या बायका त्याच्यावर प्रचंड खूश आहेत.

बाब्बो! एक दादला, त्याच्या पंधरा बायका अन् मुलं 107; कारण ऐकाल तर भुवया उंचावतील
बाब्बो! एक दादला, त्याच्या पंधरा बायका अन् मुलं 105; कारण ऐकाल तर भुवया उंचावतील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: जगात (world) रोज काही ना काही घडत असतं. काही गोष्टी सुखद असतात. तर काही गोष्टी दुखद. काही आश्चर्यकारक असतात तर काही अकल्पनीय अशा असतात. केनियातही (kenya) अशीच एक अकल्पनीय घटना घडली आहे. केनियात राहणाऱ्या एका पठ्ठ्याला एक दोन, तीन चार नव्हे तर 15 बायका आहेत. तो या सर्व बायकांसोबत (Wives) एका गावात राहतो. त्याने या बायकांमध्ये कामाचं वाटपही केलं आहे. कोणतीही झिकझिक नको म्हणून त्याने ही शक्कल लढवलीय. आपला मेंदू इतका तल्लख आहे की एकही बायको आपल्याला सांभाळू शकत नाही, असं तो म्हणतोय. असं सांगतानाच तो स्वत:ची तुलना राजा सुलैमानशीही करतोय.

या 15 बायकांच्या दादल्याचं नाव डेव्हिड सकायो कलुहाना असं आहे. तो 61 वर्षाचा आहे. त्याला 15 बायका आहेत. तसेच 107 मुलांचा तो बाप आहे. तो सध्या पश्चिमी केनियातील एका गावात राहतो.

राजाशी तुलना

राजा सुलैमान सारखाच मी आहे. राजा सुलैमानला 700 बायका होत्या. त्यामुळे मला 15 बायका असल्यास बिघडलं कुठं? असा सवाल तो करतो.

हे सुद्धा वाचा

म्हणे तेज दिमाग

माझा मेंदू प्रचंड तेज आहे. त्यामुळे मला मॅनेज करणं सोप्पं काम नाही. एक पत्नी मला मॅनेज करू शकत नाही, असा दावा या डेव्हिड बुवाने केला आहे. माझ्या मेंदूवर बराच लोड असतो. म्हणून मला एक महिला सांभाळू शकत नाही. त्यामुळेच मला अधिक विवाह करावे लागले, असं तो म्हणतो.

20 बायका असत्या तरी अडचण नव्हती

पंधराच काय? मला 20 बायका असत्या तरी काही फरक पडला नसता. मी राजा सुलैमान सारखा आहे. सुलैमानला 700 बायका होत्या. 300 दासी होत्या. त्यांच्या एकूण एक हजार बायका होत्या, असा त्याचा युक्तिवाद आहे.

पण बायका खूश

आता तुम्ही म्हणाल, डेव्हिडरावांना एवढ्या बायका आहेत. तर त्यांच्यात भांडणं होत असतील. त्या खूश नसतील. तर तुमचा अंदाज चुकलाय. त्याच्या बायका त्याच्यावर प्रचंड खूश आहेत. त्याची एक पत्नी जेसिका कलुहाना हिला डेव्हिडकडून 13 मुले आहेत. त्यातील दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आम्ही शांतपणे एकत्रित राहतो. मी माझ्या पतीवर प्रचंड प्रेम करते, असं जेसिका म्हणते. तर, मी कुणावर जळत नाही. आम्ही समन्वय राखून एकत्र राहतो, असं डुरीन कलुहाना या डेव्हिडच्या दुसऱ्या पत्नीने सांगितलं.

संमदे सुखात हाय

आम्ही एकदम सुखाचं आयुष्य जगत आहोत. आम्ही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो, असं त्याची आणखी एक पत्नी रोज कलुहानाने सांगितलं. रोज ही डेव्हिडची सातवी बायको आहे. तिला डेव्हिडपासून 15 मुले आहेत.