आपण पाहिले असेलच की अनेकदा प्रेमात फसल्यानंतर लोक धोकादायक पावले उचलतात. एखाद्याला नैराश्य येऊ लागले तर असे अनेक प्रेमी युगुल आहेत जे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रेमात फसल्यानंतर व्यवसाय करणारे क्वचितच दिसतात. आजकाल अशाच एका आशिकची स्टोरी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वास्तविक, मध्य प्रदेशातील राजगडमध्ये खिलचीपूर नगरच्या बसस्थानकावर एका प्रियकराने चहाचे दुकान उघडले असून त्याने ठेवलेल्या दुकानाचे नाव खूप आश्चर्यकारक आहे. त्यांनी आपल्या चहाच्या दुकानाला ‘M बेवफा चहावाला’ असं नाव दिलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, या तरुणाने दुकानाच्या नावाच्या सुरुवातीला एम हे अक्षर लावलं आहे कारण त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाची सुरुवात M ने होते.
केवळ आपल्या एक्स गर्लफ्रेंडला चिडवण्यासाठीच नाही तर ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीही त्यानं हे अनोखं नाव ठेवलं आहे.
या अनोख्या नावाच्या चहाच्या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रेमात फसलेल्या लोकांना इथे कमी किमतीत चहा मिळतो. चहाची किंमत 5 आणि 10 रुपये ठेवण्यात आली असली तरी प्रेमी जोडप्यांना चहासाठी 10 रुपये मोजावे लागतात.
प्रेमात फ़सलेल्यांना चहावर 5 रुपयांचं डिस्काउंट मिळतं. त्यांना फक्त ५ रुपयांत चहा मिळतो. अंतर गुर्जर असं दुकान चालवणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साधारण 5 वर्षांपूर्वी एका लग्न समारंभात तरुण आणि एका मुलीची भेट झाली होती. त्यानंतर दोघांचीही मैत्री झाली आणि मग त्यांच्यात मोबाइलवर सतत संभाषण होत असे.
या काळात या तरुणाने मुलीसोबत लग्नाचं स्वप्नही पाहिलं, मात्र मुलीनं दुसऱ्या मुलाशी साखरपुडा केल्याने त्याचं स्वप्न भंगलं. प्रेमात असूनही मुलीने या तरुणाशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हा तरुण बेरोजगार होता.
मग काय, प्रेयसीकडून झालेली ही फसवणूक तो तरुण विसरू शकला नाही आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला, पण त्याच्या मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्याच्या बेभान मैत्रिणीला काहीतरी दाखवण्याचा सल्ला दिला. रिपोर्ट्सनुसार, प्रेमात फसविल्यानंतर सुमारे दीड वर्षांनी त्याने चहाचे दुकान उघडून त्याचे नाव ‘एम बेवफा चायवाला’ असे ठेवले.