चंदीगड: कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत धावून येतात ती लोकं, ते जवान, ते पोलीस किंवा आणखी कोणीही कसलाही विचार न करता पटकन मदत करतात. जीव कुणाचाही असो ते महत्त्वाचा. मग हा जीव प्राण्याचा असो किंवा माणसाचा, प्रत्येक जीवाला तितकंच महत्त्व आहे. जीव वाचवणारा सुद्धा हा विचार करत बसत नाही की जीव कुणाचा आहे. सध्या उत्तरेला अतिवृष्टीमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. अग्निशमन दलाचे जवान नेहमीप्रमाणे त्यांची ड्युटी पार पडतायत. अशाच एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात हा नेमका कुणाला वाचवतोय ते तर बघा, तुम्हालाही फार कौतुक वाटेल!
व्हिडीओत एका पुलावरून खाली शिडी जाताना दिसते, खाली पुराचं पाणी आहे. त्या पाण्याची पातळी वाढत चाललीये. पूरसदृश्य परिस्थिती दिसून येतेय. अशातच एक एक जीव किती महत्त्वाचा आहे नाही का? त्यात जे जीव वाचवत आहेत त्यांनीही कशाचाही विचार न करता जीव वाचवणं म्हणजे किती छान ना? हा व्हिडीओ बघा. ही घटना चंदीगडमधली आहे. चंदीगड पोलिसांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यात या अग्निशमन दलातील जवानाने एका कुत्र्याला वाचवलंय. पुरात अडकलेल्या या कुत्र्याला वाचवताना त्यांनी दाखवून दिलंय की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येक जीव वाचवला जाईल!
Kudos to team of Fire department assisted by Chandigarh police team, a puppy stranded under Khuda Lahore bridge due to heavy water flow was Rescued.#EveryoneIsImportantForUs#LetsBringTheChange#WeCareForYou pic.twitter.com/yHtZuBLgvy
— SSP UT Chandigarh (@ssputchandigarh) July 10, 2023
हा व्हिडिओ चंदीगड पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. पूरसदृश्य परिस्थितीत अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी या व्यक्तीने आपला जीव धोक्यात घातला. त्याचे ऑनलाइन खूप कौतुक झाले. चंदीगड पोलिसांनी लिहिले, “चंदीगड पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या पथकाचे अभिनंदन, खुदा लाहोर पुलाखाली अडकलेल्या पिल्लाला पुरात वाचवण्यात यश आले.” विशेष म्हणजे हे ट्विट #EveryoneIsImportantForUs, #LetsBringTheChange, #WeCareForYou अशा हॅशटॅगसह शेअर करण्यात आले आहे.