मुंबई: या जगात खूप अतरंगी लोकं आहेत. ही लोकं सोशल मीडियामुळे आपल्याला कळून येतात. सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर कधी लोकांचे डान्सचे व्हिडीओ, कधी गाण्याचे व्हिडीओ, कधी कुठला प्रॅन्क तर कधी अजून काही असं सतत व्हायरल होत असतं. आपल्याला कधी हसू येतं तर कधी धक्का बसतो. हे सगळं बघून आपल्यालाही कळून येतं की जगात इतके विचित्र लोक आहेत. आता हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती मॉल मध्ये चक्क घोड्यावर बसून फिरतोय. या राजांनी शॉपिंग साठी घोडा आणलाय. शॉपिंग तर कुणीही करतं पण डायरेक्ट मॉल मध्येच घोडा घेऊन जाणं म्हणजे कसं? हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ बघा, एक माणूस घोड्यावर बसून मॉल मध्ये आलाय आणि तो त्या घोड्यावरून खाली उतरत सुद्धा नाहीये. तो घोड्यावरच बसून सामान विकत घेतोय. मॉल मध्ये जाताना तर आपणच आपले खूप नियम पाळतो. आपण चांगले कपडे घालून जातो, आपल्याला वाटतं आपण भारी दिसावं, घरातले कपडे घालू नये चांगलं काहीतरी घालून जावं आणि आपण तसे जातो सुद्धा. मग कधी कुणी घोडा घेऊनच मॉल मध्ये शिरेल असा तुम्ही विचार करू शकता का?
Typical Walmart In Texas pic.twitter.com/tBeLlofToL
— MadVids (@MadVidss) September 21, 2023
हा व्हिडीओ टेक्सस मधला आहे. हा माणूस घोडा घेऊन वॉलमार्ट शोरूम मध्ये आला होता. @MadVidss या नावाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. 21 सेकंदाचा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिलाय. “हा खूप नशीबवान आहे की याच्या घोड्याने मॉलमध्ये घाण केली नाहीये” अशी प्रतिक्रिया लोकांनी यावर दिलीये. पांढऱ्या घोड्यावर हा माणूस मॉल मध्ये फिरतोय. त्याने हातात एक बादली धरलीये. ही बादली त्याने कदाचित मॉल मधूनच घेतली असावी. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय.