Skating shocking video : अपघात सांगून कधीच होत नाहीत, हे तुम्हाला चांगलेच माहीत असेल. म्हणूनच रस्त्यावरून चालताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा अपघाताला बळी पडतात, हे तुम्ही पाहिले असेलच. यामुळेच लोकांना नेहमी जास्त वेगाने वाहने न चालवण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे वाहनचालकांचे नुकसान तर होतेच पण इतर लोकही त्यांच्या अपघातात बळी पडतात. रस्त्यांवर स्केटिंग करणाऱ्या लोकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण यामध्ये अतिवेगाने अपघात (Accident) होऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर स्केटिंग करताना भीषण अपघाताचा बळी ठरते. म्हणूनच लोकांना सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती पूर्णपणे रहदारी नसलेल्या रस्त्यावरून वेगाने स्केटिंग करत आहे. दरम्यान, अचानक त्याचा तोल बिघडला आणि तो भरधाव वेगात असलेल्या स्केट बोर्डवरून खाली पडला. त्याचा वेग अतिशय वेगवान असल्याने अशा स्थितीत तो उलटापालटा होत दूरवर जाऊन पडतो. त्याने हेल्मेट घातले असले तरी अशा स्थितीत त्याच्या डोक्याला दुखापत झाली नाही, मात्र तो ज्या पद्धतीने पडला त्यावरून त्याच्या शरीरावर जखमा झाल्या असतील.
हादसे कभी बताकर नहीं होंते.
इसलिए वाहन चलाते समय, खेल-कूद में एवं अपने कार्यक्षेत्र के अनुरूप सुझाए गए सुरक्षा उपकरण हमेशा अनुशासन के साथ पहनें.#SafetyFirst #Roadsafety pic.twitter.com/XtsJlyAenL— Dipanshu Kabra (@ipskabra) March 5, 2022
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की सांगून कधीच अपघात होत नाहीत. त्यामुळे, वाहन चालवताना, खेळात आणि तुमच्या कार्यक्षेत्रानुसार शिस्तीने शिफारस केलेली सुरक्षा उपकरणे नेहमी परिधान करा.
अवघ्या 5 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच प्रत्येकाने रस्त्यावर सावधपणे चालण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेचा अवलंब करा, अपघात टाळा, असे एकाने म्हटले आहे.