झोपाळ्यावर झोके घेणं, ही लहान मुलांसाठी आनंद देणारी गोष्ट. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला झोपाळा हा आवडतोच. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा झोपाळा हा जीवावरही बेतू शकतो, याची जाणीव एका तरुणाला नुकतीच आली आहे. आपल्या मित्राला जोरात झोका देण्यासाठी गेलेला एक तरुण चांगलाच तोंडावर आपटणार होता. झोका देणाऱ्या या तरुणाची अवस्था जीव जाईल, इतकी वाईट झाली होती. सुदैवानं या तरुणाचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! आश्चर्यकारकरीत्या हा तरुण बचवला आहे. ही थराराक घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
इन्स्टाग्रामवर नुकताच या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक तरुण झोपाळ्यावर झोका घेत होता. त्यादरम्यान, त्याचा एक मित्र त्याला जोरात झोका देण्यासाठी पुढे आला. हा झोपाळा घेत असताना समोर खोल दरी होती. या दरीच्या कोपऱ्यावर झोका घेत असताना, वाऱ्याच्या वेगासोबत एक तरुण झोपाळ्याचा आनंद घेत होता.
पण त्याच्या मित्राचा अतिउत्साह चांगलाच नडला. झोपाळ्यावर बसलेल्या मित्राला जोरात झोका देण्यासाठी पुढे आलेला हा अतिउत्साही मित्र तोल घसरुन जोरात जमिनीवर आदळला. इतकच काय तर झोक्यासोबत खोल दरीत पडणार आहोत, असं झोका देणाऱ्याला वाटलं. झोक्यासोबत झोपाळ्यावर बसलेला तरुण मागे आला खरा. पण त्याच्या मित्र खाली खोल दरीत पडला की काय, असा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला.
सुदैवानं झोका देणाऱ्या तरुण आश्चर्यकारकरीत्या झोपाळ्याच्या खालच्या बाजूला अडकला. दरीत कोसळणार, याऐवजी तो झोपाळ्यासह जमिनीच्या बाजूला खेचला केला. याची देही याची डोळा, या तरुणानं आपला मृत्यू पाहिला होता. मात्र थोडक्यात हा तरुण बचवला. काळजाचा ठोका चुकवणारा हा थरारक व्हिडीओ socialstarofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 24.8 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला असून हजारो युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
PM – KISAN | पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार ?
UP Crime : प्रियकराशी भांडण करून प्रेयसी ट्रकमधून खाली उतरली अन् जीवाला मुकली, वाचा नेमके काय घडले?