विमानात प्रवाशांना एका प्रवाशाला चांगलाच चोप दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विमानात बसलेली एक व्यक्ती हजारो फूट हवेत उडणाऱ्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विमानात बसलेले बाकीचे लोक चांगलेच घाबरले. या व्हिडिओमध्ये इतर प्रवासी गेट उघडणाऱ्या व्यक्तीला पकडून चोप देताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी त्याच्या या कृत्याबद्दल टीका ही केली आहे. विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती विमानाचा इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला इतर प्रवाशी रोखत आहेत. 12 सेकंदाच्या या क्लिपमध्ये सुरक्षा कर्मचारी या व्यक्तीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशा कृत्यासाठी त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी, असे लोकं सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
VÍDEO — Passageiro tenta abrir porta de avião em voo Brasília–Panamá; Caso aconteceu na manhã da terça-feira (5), minutos antes de aeronave pousar na Cidade do Panamá. Passageiro foi detido pelas autoridades. pic.twitter.com/gDTyB5fwg3
— Nelson Carlos dos Santos Belchior (@NelsonCarlosd15) November 5, 2024
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पनामा सिटीमध्ये हे विमान सुरक्षितपणे उतरले आहे. विमानाचे लँडिंग होताच या बेशिस्त प्रवाशाला अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत बोलताना इतर प्रवाशांनी सांगितले की, क्रूची कृती अप्रतिम होती. त्यांच्यामुळेच आज आपण सर्व सुरक्षित आहोत.
दुसऱ्या एका प्रवाशाने म्हटले की, सांंगून देखील तो माणूस ऐकत नव्हता. त्याने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी त्याला अडवले, त्यानंतर तो सर्वांशी हाणामारी सुरू केली. यानंतर इतर प्रवाशांनी या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.