बऱ्याचदा जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण अस्वस्थ होतो, हे केवळ माणसांसोबतच नाही तर पशू -पक्ष्यांसोबतही घडते. मात्र, बोलता येत नसल्याने ते आपले शब्द कोणाला सांगू शकत नाहीत, पण भावनेद्वारे, हालचालींद्वारे ते आपली इच्छा व्यक्त करतात. असंच काहीसे त्यावेळी दिसून येते. जेव्हा एक खारुताई खूप तहानलेली असते आणि कोणालाही काहीही सांगू शकत नाही. ( Man who help helping thirsty squirrel drink water from bottle video goes viral)
व्हिडिओमध्ये एक खारुताई दिसत आहे, जी खूप तहानलेली आहे. ती एका व्यक्तीकडे येते ज्याच्या हातात बाटली आहे आणि त्याला पाणी मागतो. पण त्याला काही कळत नाही. या दरम्यान त्याची तहान आणखी वाढते. तेव्हा ती कोणत्याही उपायांचा विचार करत नाही, तेव्हा ती हात जोडून पाणी देण्याची प्रार्थना करू लागते.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक खारुताई खूप तहानलेली आहे. ती पाण्यासाठी समोर उभ्या असलेल्या व्यक्तीसमोर हात जोडत आहे, त्या व्यक्तीला खारुताईच्या भावना समजत नाहीत. त्यानंतर ती व्यक्ती दोन पावले मागे येते. खारुताई अजूनही जात नाही आणि हात जोडून पाणी पिण्याची प्रार्थना करत राहते, त्यानंतर त्या व्यक्तीला खारुताईच्या भावना समजतात. यानंतर तो खारुताईला पाणी देतो.
व्हिडीओ पाहा
हा 42 सेकंदांचा व्हिडिओ दाखवतो की मानवता आणि भूतदयेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. हा व्हायरल व्हिडिओ फेसबुकसह यूट्वयुबर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ते 50 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 4 लाखांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे, सुमारे तीन हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, तर 1.9 हजार लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केली आहे.
बऱ्याच लोकांनी याला दुर्दैवी म्हटले आणि सांगितले की आपल्याला लाज वाटली पाहिजे की जनावरांना पाणी दुसऱ्यांकडे मागून प्यावे लागते. आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या. तर असे बरेच लोक आहेत ज्यांनी खारुताईला पाणी देणाऱ्या व्यक्तीचे कौतुक देखील केले आहे.
हेही पाहा: