Horse Riding: नवरदेवाची स्वारी घोड्यावरच का? लग्नाची मिरवणूक घोड्यावरच का?

| Updated on: Jun 27, 2023 | 4:50 PM

लग्नाची मिरवणूक घेऊन सासरच्या घराकडे जाताना नवरदेव घोड्यावर स्वार होतो. पण नवरदेव घोड्यावरच का स्वार होतो दुसऱ्या प्राण्यावर का नाही? हा प्रश्न अनेकांना पडतो. काय कारण असू शकतं? तुम्ही म्हणाल प्रथा परंपरा म्हणून हे सगळं केलं जातं, पण यामागे आणखीही काही कारणं आहेत. जाणून घेऊयात.

Horse Riding: नवरदेवाची स्वारी घोड्यावरच का? लग्नाची मिरवणूक घोड्यावरच का?
Horse riding at indian wedding
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: भारत हा असा देश आहे जिथे लग्नसमारंभात सर्व प्रकारचे विधी किंवा परंपरा पार पाडल्या जातात. यातील एक परंपरा अशी आहे की, लग्नाच्या वेळी नवरदेव घोड्यावर स्वार होतो. घोड्यावर स्वार होणे अत्यंत शुभ मानले जाते. लग्नाची मिरवणूक घेऊन सासरच्या घराकडे जाताना नवरदेव घोड्यावर स्वार होतो. पण नवरदेव घोड्यावरच का स्वार होतो दुसऱ्या प्राण्यावर का नाही? हा प्रश्न अनेकांना पडतो. काय कारण असू शकतं? तुम्ही म्हणाल प्रथा परंपरा म्हणून हे सगळं केलं जातं, पण यामागे आणखीही काही कारणं आहेत. जाणून घेऊयात.

चांगल्या आरोग्याचे लक्षण

खरं तर घोड्यावर स्वार होण्यामागे एक कारण नाही तर अनेक कारणं असतात. एक-दोन कारणे अतिशय प्रायोगिक कारणे आहेत, तर काही कारणे परंपरेनुसार आहेत. घोड्यावर स्वार होणे हे नवरदेवाच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे कारण घोडी एक चपळ प्राणी आहे आणि केवळ निरोगी व्यक्तीच त्यावर स्वार होऊ शकते. नवरदेव जर घोड्यावर उत्तम प्रकारे कसलीही गडबड न करता स्वार होऊ शकला तर तो कौटुंबिक दोरी सांभाळू शकतो असं समजलं जातं.

चंचल पत्नीला देखील सांभाळू शकतो

घोड्यावर बसणे ही नवरदेवासाठी एक प्रकारची परीक्षाच आहे, असेही मानले जाते. जर नवरदेव घोड्यावर चांगल्या प्रकारे स्वार करू शकला तर असं समजलं जातं की तो संयमाने आणि प्रेमाने आपल्या चंचल पत्नीला देखील सांभाळू शकतो. तो आपल्या जबाबदाऱ्याही व्यवस्थित पार पाडेल.

योध्यांना वधूसाठी लढाया लढाव्या लागत

प्राचीन काळी जेव्हा लग्ने व्हायची तेव्हा वधूला शौर्य दाखवावे लागत असे. त्या काळी योद्धे घोड्यावर जात असत. अनेकदा वधूला पळून जावे लागायचे. अनेकदा तर या योध्यांना वधूसाठी लढाया लढाव्या लागत. त्या काळी घोडा शौर्याचे प्रतीक मानला जात असे. आता बदलत्या युगात घोड्याची जागा घोडीने घेतली आणि त्याला आता शगुन समजू लागलेत.