लग्नाआधी मुलांना एक प्रश्न विचारला जातो- दारू आणि सिगारेट पित नाही का? बहुतेक तरुण याला नकार देतात. पण जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जनतेने पाहिला तेव्हा लोकांना धक्काच बसला. या क्लिपमध्ये एक महिला नवरदेवाला सिगारेट सिगारेट पेटवून देते. या व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम रीलमध्ये नवरदेव शांत बसलेला दिसत आहे, त्याच्यासोबत वधूचे वडील आणि आई देखील दिसत आहेत. म्हणजे मुलाचे सासरे उपस्थित असतात. सासू नवरदेवाच्या तोंडात सिगारेट टाकते आणि मग ती पेटवून देते. खरं तर ही प्रथा आहे, जी दक्षिण गुजरातमधील काही गावांमध्ये केली जाते. तसे तर या विधीबद्दल ऐकून लोक हैराण झालेत.
इन्स्टाग्राम युजर आणि फूड ब्लॉगर जुही (@joohiie) यांनी 7 फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, तिला नुकतीच लग्नाची एक नवीन परंपरा दिसली, ज्यामध्ये सासू विडी आणि पान घालून मिठाई देऊन नवरदेवाचे स्वागत करते. या इन्स्टाग्राम रीलला 7 लाख 1 हजार लाइक्स आणि 46 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
तसेच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. जसं एका व्यक्तीनं लिहिलं, “वधू कशीही भेटू, सासू अशी भेटावी.” एका युजरने याला सिगारेट उडवण्याचा विधी म्हटले आहे.
जुहीने पोस्टसोबत एक डिस्क्लेमरदेखील दिले, ज्यात तिने स्पष्ट केले की ही एक जुनी परंपरा आहे, जी दक्षिण गुजरातमधील काही गावांमध्ये पाळली जाते. नवरदेव धूम्रपानही करत नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.
टीप: धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.