एकाचवेळी 18 मुलांना करत होती डेट, पण ‘या’ एका चुकीमुळे अशी पकडली गेली

| Updated on: Apr 08, 2023 | 5:22 PM

एकाच वेळी 18 मुलांना डेट करत होती, इतकंच काय तर तिने एकसाथ सगळ्यांना लग्न करायचं वचन सुद्धा दिलेलं होतं. ती त्या मुलांना डेट करत होती कारण...

एकाचवेळी 18 मुलांना करत होती डेट, पण या एका चुकीमुळे अशी पकडली गेली
18 boyfriends at one time
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: राजकारणातील घोटाळे, भ्रष्टाचार याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्ही कधी रोमान्समध्ये घोटाळा ऐकला आहे का? चला तर मग तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट सांगतो. अलीकडेच चीनच्या शांघाय पोलिसांनी अशाच एका मुलीला अटक केली आहे. जी एकाच वेळी 18 मुलांना डेट करत होती, इतकंच काय तर तिने एकसाथ सगळ्यांना लग्न करायचं वचन सुद्धा दिलेलं होतं. ती त्या मुलांना डेट करत होती कारण ती त्या सर्वांकडून पैसे उकळत होती.

वास्तविक ही घटना चीनमधील शांघाय येथील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 2017 पासून तिने 18 मुलांना एकत्र डेट केले आहे. त्याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे या मुलीचे लग्न 2014 मध्ये झाले होते, तिला एक मूलही आहे. यानंतरही तिने या सर्व 18 मुलांची फसवणूक केलीये.

ती मुलांची फसवणूक करत होती कारण ती त्यांच्याकडून भरपूर पैसे उकळत होती. ती त्यांच्यासोबत डेटवर सुद्धा जायची आणि त्यांच्यासोबत रोमान्स देखील करायची. पण तिने कधी एकाही मुलाला आपले सत्य सांगितले नाही आणि ती आणखी किती मुलांना डेट करत आहे हे देखील सांगितले नाही. पण तिच्या एका चुकीचा तिला फटका बसला आणि शेवटी ती पोलिसांच्या हाती लागली.

रिपोर्टनुसार, जेव्हा ती डेट करत असलेल्या काही मुलांनी तिच्याकडे विवाह नोंदणी करण्याचा विषय काढला तेव्हा तिने वारंवार नकार दिला. मग त्या मुलांना शंका आली. तिने हा विषय वेगवेगळी कारणं देऊन टाळला. यातल्या काहींनी तर पोलिसांत जाऊ असं म्हणत आपले पैसे सुद्धा तिच्याकडून वसूल केले. संशय बळावत गेला आणि त्या मुलीचं प्रकरण उघडकीस आलं. या सगळ्या घटनेनंतर तिला अटक करण्यात आलीये.