ट्रिग्नॉमेट्री आठवते का? किती अवघड वाटायचं ना गणित शाळेत, कॉलेजात असताना? खरं तर आताही शिकायला घेतलं तरी तितकंच अवघड जाणारे. पण कधी कधी असं वाटतं कलाकार या शिक्षणाच्या क्षेत्रात का येत नाहीत. एखादी गोष्ट पाठांतरास इतकी अवघड जाते, गाणं बनवलं समजा एखाद्या फॉर्म्युल्याचं तर सोपं जाईल नाही का? एखाद्या रॅप मध्ये किंवा एखाद्या बॉलिवूडच्या गाण्यात तो फॉर्म्युला असावा. मग काय नो टेन्शन! ऐकता ऐकता पाठ कधी होऊन जाईल कळणार सुद्धा नाही.
आजकाल एक व्हिडीओ व्हायरल होतोय. अमेरिकेत भारतीय गणिताचे शिक्षक ट्रिग्नॉमेट्री ज्या प्रकारे शिकवतायत ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
शिक्षणाचा एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे, ज्याची लोकांना खूप आवड आहे. हे विद्यार्थ्यांना काठी किंवा शिक्षेची भीती दाखवून नव्हे, तर गाणी गाऊन गणिताच्या सूत्रांची शिकवण देतायत.
याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात शिक्षक कशाप्रकारे गाणी म्हणत विद्यार्थ्यांना फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगतायत हे दिसतंय. विद्यार्थीही खूप खूश आहेत.
Math also can be fun…Indian teacher teaching Trigonometry in US ? pic.twitter.com/GnrCT40YEv
— A K ?? (@AK_Inspire) October 16, 2022
ट्विटरवर हा व्हिडिओ @AK_Inspire नावाच्या हँडलने शेअर केला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गणित इतके मजेदार असेल असे कधी वाटले नव्हते. अमेरिकेत अशा प्रकारे ट्रिग्नॉमेट्री (त्रिकोणमिती) शिकवणारे भारतीय शिक्षक.”
हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 10 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 25 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. याशिवाय युजर्सही आपला फीडबॅक देतायत.