Political Memes: “हे प्रभू यह कौनसा अस्त्र है?”फडणवीसांना नेटकऱ्यांचा प्रश्न! काही विचारतायत नेमकं झालंय काय? शिवसेनाच आली का परत?

| Updated on: Jul 01, 2022 | 8:57 AM

कुणी म्हणतोय हा तर फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, कुणी म्हणतंय अरेच्चा ही तर गुगली! चला बघुयात नवे कोरे करकरीत मिम्स...

Political Memes: हे प्रभू यह कौनसा अस्त्र है?फडणवीसांना नेटकऱ्यांचा प्रश्न! काही विचारतायत नेमकं झालंय काय? शिवसेनाच आली का परत?
फडणवीसांना नेटकऱ्यांचा प्रश्न!
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: काल महाराष्ट्रातल्या राजकारणातला (Mahrashtra Politics) सगळ्यात मोठा दिवस होता. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राजकारणातली गणितं बदलली. बरं मग आता सगळ्यांना वाटलं आता भाजप आणि शिंदे गटात युती होईल आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील. पण फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या जनतेवर बॉम्ब टाकला. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बसणार अशी घोषणा करण्यात आली. आधी तर फडणवीसांनी सांगताना मी कुठलंही पद न घेता जनतेचा सेवक असेल आणि सरकारला पाठिंबा देईल असं सांगितलं पण केंद्रातून आदेश आले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. काल या या दोन्ही पदांसाठीचा शपथविधी पार पडला! या दरम्यान लोकं मात्र गोंधळून गेले, काहींनी समर्थन केलं काहींनी विरोध! देवेंद्र फडणवीसांची वाह वाह झाली, त्यांचा चाहतावर्ग मात्र नाराज झालाय. सोशल मीडियावर (Social Media) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यावर मिम्सचा पाऊस झाला, भन्नाट मिम्स शेअर करण्यात आले…कुणी म्हणतोय हा तर फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक, कुणी म्हणतंय अरेच्चा ही तर गुगली! चला बघुयात नवे कोरे करकरीत मिम्स…

1) थ्री इडियट्सचा डायलॉग वापरून मिम

2) शिवसेना, भाजप, शिंदे गट या सगळ्याचं मिश्रण!

3) देवेंद्र फडणवीसांचा पावसात भाषण करताना फोटो!

4) तु तो देवमाणूस निकाला रे!

5) हे सगळ्यांनाच पटेल असं मिम !

6) तिन्ही पक्ष फडणवीसांना विचारतायत,”हे प्रभू यह कौनसा अस्त्र है?”

7) काय झालंय? कुणाला कळलंय का काय झालंय??

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)