फेसबुक, इन्स्टा अन् WhatsApp डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Social Media | काहीवेळापूर्वीच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp ची सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र, या सेवा अजूनही पूर्वीच्या वेगाने सुरु झालेल्या नाहीत. त्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
1 / 9
जगभरात सोमवारी रात्री फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp ची सेवा ठप्प झाली होती. तब्बल सात तासानंतर तांत्रिक बिघाड दूर होऊन सेवा पूर्ववत झाली.
2 / 9
कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित मीम्स व्हायरल होतात. तसाच प्रकार कालही पाहायला मिळाला.
3 / 9
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp ठप्प झाले असतानाही ट्विटरची सेवा सुरु होती. त्यामुळे ट्विटरवर अनेक मजेशीर मिम्स व्हायरल होताना दिसली.
4 / 9
काहीवेळापूर्वीच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp ची सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र, या सेवा अजूनही पूर्वीच्या वेगाने सुरु झालेल्या नाहीत. त्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
5 / 9
सोमवारी रात्री साधारण आठ वाजल्यापासून जगभरात Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस डाऊन झाले. त्यामुळे नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करता येत नव्हती. तसेच अलीकडच्या काळातील संवादाचे प्रमुख माध्यम असलेल्या Whatsapp वरुन एकमेकांना संदेशही पाठवता येत नव्हते. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात चलबिचल सुरु झाली होती. रात्री उशीरापर्यंत अनेकजण सोशल मीडिया कधी पूर्ववत होणार, याची वाट पाहत होते.
6 / 9
अखेर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर होऊन Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
7 / 9
अनेक कंपन्या आणि संस्थांसाठी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक या व्यासपीठांचा वापर केला जातो. परंतु, तब्बल सहा तास ही दोन्ही व्यासपीठं ठप्प असल्याने अनेकांना त्याचा फटका बसला होता.
8 / 9
सोशल मीडियावर मजेशीर मिम्स व्हायरल
9 / 9
जगभरात सोमवारी रात्री फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp ची सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर मजेशीर मिम्सचा पाऊस पडताना दिसला.