आजकाल वाढत्या महागाईने प्रत्येकजण त्रस्त आहे. पेट्रोल-डिझेल असो किंवा खाद्यपदार्थ, एक काळ होता जेव्हा या सर्व गोष्टी अत्यंत स्वस्तात मिळत होत्या. असाच एक मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकेकाळी मिठाई आणि समोसे यांची किंमत किती कमी असायची हे हा मेन्यू कार्ड पाहून स्पष्ट होतंय. हे मेन्यू कार्ड पाहून तरुण वर्ग हैराण झालाय. तुम्हाला सुद्धा हा फोटो बघून आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेन्यू कार्डमध्ये आजकाल 30 ते 40 रुपयांच्या दरम्यान मिळणारी रसमलाई एकेकाळी केवळ 1 रुपयात मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे तेव्हा लोक फक्त 50 पैशात समोसे विकत घेऊन खात असत, जे आता 12-15 रुपयांना मिळतात.
त्याचप्रमाणे आजकाल 300 ते 400 रुपये किलोने मिळणारा गुलाब जामुन तेव्हा केवळ 14 रुपये किलोने विकत घेतला जात होता आणि संपूर्ण कुटुंब ते खात असे. सुमारे 250 ते 300 रुपये किलोदराने मिळणारे मोती चूरचे लाडूही त्यावेळी केवळ 10 रुपये किलोदराने खरेदी करता येत होते. हे मेनू कार्ड 1980 सालचे आहे.
या मेन्यू कार्डवर लोक आपल्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका इंटरनेट युजरने लिहिले की, “आधी खरंच सर्व काही इतक्या स्वस्तात उपलब्ध होते का? दुसरा युजर लिहितो, “माझी इच्छा आहे की आधीचा काळ पुन्हा परत यावा, किती मजा येईल.” काही जण म्हणतात, 1980 मध्ये त्यांचा पगार 1000 रुपये होता, तो आता 1 लाख रुपये झाला आहे. पण आता महागाई त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.