प्रत्येकजण नोकरी करून पैसे कमावतो, पण काही लोक त्यासाठी विचित्र पद्धतीही अवलंबतात.अनेकदा अशा या विचित्र पद्धती चर्चेत येतात. एका स्त्रीची सध्या अशीच चर्चा आहे जी लोकांना ‘प्रेमाची मिठी’ मारते आणि तेही पैसे घेऊन.
तसे पाहिले तर तुम्ही नेहमी पाहाल की नोकरीमध्ये लोकांना शारीरिक तसेच मानसिकरित्या ताण असतो. पण या स्त्रीचे काम असे आहे की, तिच्याकडे लोक आपले सगळे ताण विसरू शकतात कारण ती जादूची झप्पी देते.
ही नोकरी व्यावसायिक कडलर म्हणून ओळखली जाते. या नोकरीची खास गोष्ट म्हणजे लोक प्रोफेशनल कडलरकडे प्रेम आणि आराम शोधण्यासाठी येतात आणि त्याबदल्यात हजारो रुपये खर्चही करतात.
मिसी रॉबिंसन असं या महिलेचं नाव असून ती ऑस्ट्रेलियाची आहे. ती लोकांना मिठी मारते आणि त्यांचे सांत्वन करते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ती एकटेपणा आणि व्यथित झालेल्या लोकांना मिठी मारून त्यांचे दु:ख ऐकते आणि अशा प्रकारे त्यांचा तणाव दूर करण्यास मदत करते. तिने कडलिंगसाठी खास सेशन्स आणि वेळा सुद्धा ठरवून ठेवलेल्या आहेत.
मिस्सी या कामाच्या बदल्यात लोकांकडून पैसेही आकारते. ती एका सत्रात सुमारे ८,००० रुपये घेते. मिसी म्हणते की ती लोकांना जी प्रेमळ मिठी मारते त्याला ‘कडल थेरपी’ असेही म्हणतात.
तिच्या मते हे काम करण्याची कल्पना तिला एक टीव्ही शो पाहिल्यानंतर सुचली, ज्यामध्ये प्रोफेशनल कडलर्स लोकांना ‘प्रेमाची मिठी’ देताना दाखवण्यात आले.
मिस्सी तिच्या कार्याला ‘समाजसेवा’ मानते कारण ती मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना तणावातून बाहेर पडण्यास मदत करते.