मुंबई : सोशल मीडियावर (Social media) वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या एक अंगावर काटा आणणारी एक गोष्ट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. एका माकडाने चिमुकलीवर हल्ला (Monkey Attack) केलाय. यात ही चिमुकली (Cute little girl) गंभीररित्या जखमी झाली आहे. 3 वर्षांची एक मुलगी रस्त्यावर खेळत असताना अचानकपणे एक माकड त्या ठिकाणी येतं. तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करतं. त्याची दृश्य पाहिल्यानंतर हे माकडं तिला पकडून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर या चिमुकलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.
एका माकडाने चिमुकलीवर हल्ला केलाय. यात ही चिमुकली गंभीररित्या जखमी झाली आहे. 3 वर्षांची एक मुलगी रस्त्यावर खेळत असताना अचानकपणए एक माकड त्या ठिकाणी येतं. तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करतं. त्याची दृश्य पाहिल्यानंतर हे माकडं तिला पकडून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. थोडक्यात काय तर या चिमुकलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. 19 एप्रिलला ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चीनमधील चोंगकिंगमध्ये ही घटना घडली. यात या मुलीला दुखापत झाली आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.
या चिमुवकलीचा एका व्यक्तीने जीव वाचवलाय. लिऊ नावाच्या व्यक्तीने तिला माकडाच्या तावडीतून वाचवलंय. ” एक मुलगी मला रडताना आणि ओरडत आढळली. मला तो आवाज आल्याने मी धावत घटनास्थळी दाखल झालो आणि तिला माकडाच्या तावडीतून वाचवलं”, असं या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
चीनमधल्या एका वृत्तसंस्थेला तिथल्या सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली. “आम्हाला असं दिसतंय या शहरा जवळच्या डोंगरावर माकडांचा वास आहे. त्यांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.माकडांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून ते लोकांचे नुकसान होणार नाही. तसेच आम्ही आजूबाजूच्या परिसरात गस्त वाढवण्यावर भर देणार आहोत”, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय.
संबंधित बातम्या