तंत्रज्ञानामुळे आजकालची मुले स्मार्ट झाली आहेत. ज्येष्ठ अन् युवकांना गॅझेटचा वापर चांगल्या पद्धतीने करता येत नाही. परंतु मुलांकडून स्मार्ट पद्धतीने ते वापरले जातात. उत्तर प्रदेशातील बस्ती शहरातून एक चांगली बातमी आली आहे. बस्ती शहरातील विकास कॉलनीमधील ही घटना आहे. या कॉलनीतील एका घरात १३ वर्षांची निकीता आणि तिची १५ महिन्यांची भाची घरात खेळत होती. त्यावेळी घरात माकडांची झुंड आली. त्या झुंडीने घरातील सामान फेकणे सुरु केले. त्याच खोलीत तिची १५ महिन्यांची भाची खेळत होती. माकडे भाचीवर हल्ला करणार? तोपर्यंत निकिताने डोके चालवले. तिने ‘एलेक्सा’ ला कंमाड दिली. त्यानंतर माकडे घरातून पळाले.
निकिता आणि तिच्या भाची एका खोलीत खेळत होते. घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी अचानक माकडाची झुंड आली. त्यानी स्वयंपाकघरातील सामान इकडे-तिकडे फेकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी 15 महिन्यांची निकिताची ती भाची प्रचंड घाबरली. निकिता माकडांना पाहून भाचीला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी माकडे त्याकडे वळू लागली. काय करावे, हे निकिताचा सूचत नव्हते. मग अचानक तिचे लक्ष फ्रिजवर पडलेल्या ‘एलेक्सा’कडे गेले.
निकिताचे लक्ष ‘एलेक्सा’कडे जाताच तिच्या डोक्यात कल्पना आली. तिने ‘एलेक्सा’ कुत्र्यांची आवाज काढण्याची कमांड दिली. ‘एलेक्सा’ने कंमाड ऐकताच जोरजोराने कुत्र्यांचा आवाज काढला. माकडांना मात्र कुत्रेच आल्याचा भास झाला. त्यांनी त्या खोलीतून पळ काढला.
‘एलेक्सा’ एक व्हाईस कंमाड असणार स्पीकर आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून दिलेला टास्क पूर्ण करतो. त्यात हवी ती गाणी लावता येतात. निकिताने कुत्र्यांचे आवाज काढण्याची कंमाड देताच एलेक्साने कुत्र्यांचे आवाज काढले. त्यामुळे माकडांनी पळ काढला आणि तिच्या भाचीचे प्राण वाचले. निकिताच्या या कल्पकतेचे चांगले कौतूक होत आहे.