Video | आधी मनसोक्त खेळले नंतर उतरताना झाले स्पायडर मॅन, दोन माकडांची ‘ही’ टेक्निक एकदा पाहाच

| Updated on: Jun 20, 2021 | 9:39 PM

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा तुम्हाला खळखळून हसायला लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये माकडांनी एका इमारतीवरुन उतरण्यासाठी चांगलंच डोकं वापरलं आहे.

Video | आधी मनसोक्त खेळले नंतर उतरताना झाले स्पायडर मॅन, दोन माकडांची ही टेक्निक एकदा पाहाच
MONKEY VIRAL VIDEO
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ पाहून तुम्हाला एखादा धडा मिळतो तर काही व्हिडीओ पाहून हसू फुटते. काही व्हिडीओंमुळे तर आपण दिवसभर हसत राहतो. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा तुम्हाला खळखळून हसायला लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये माकडांनी एका इमारतीवरुन उतरण्यासाठी चांगलंच डोकं वापरलं आहे. (Monkey used Spiderman technique for climbing down video went viral on social media)

दुसऱ्या माकडाकडून पहिल्या माकडाची नक्कल

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन माकड दिसत आहेत. ते एका इमारतीवर चढलेले असून त्यांची मस्ती सुरु आहे. नंतर अचानकपणे त्यातील एक माकड इमारतीवरुन खाली उतरायला लागतेय. आपला सोबती खाली उतरत असल्याचे समजताच दुसरं माकडसुद्धा पहिल्या माकडाची नक्कल करुन खाली उतरत आहे. लोकांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन माकड इमारतीवरुन उतरताना दिसत आहेत. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही विशेष वाटणार नाही. मात्र, दोन्हीही माकडांनी उतरण्यासाठी सारखीच युक्ती वापरली आहे. दोघांचीही अ‌ॅक्शन हुबेहुब सारखीच आहे. स्पायडरमॅन जसा इमारतींवरुन सरसर खाली उतरतो, अगदी तशाच पद्धतीने हे दोन्ही माकडं इमारतीवरुन उतरत आहेत. माकडांच्या याच कृतीला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, त्याला प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताच लोक त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच आतापर्यंत हा व्हिडीओ तब्बल 94 हजार वेळा पाहिला गेला आहे.

इतर बातम्या :

Video | बाण मारला अन् थेट अंगठीत घुसला, धडाकेबाज तिरंदाजाची दमदार कामगिरी, व्हिडीओ पाहाच

Video | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच

Video | एकाकीपणा घालवण्यासाठी तरुणाचा जबरदस्त जुगाड, नेटकरी म्हणतायत हा तर सर्वोत्तम उपाय !

(Monkey used Spiderman technique for climbing down video went viral on social media)