मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात प्राण्यांच्या व्हीडिओंना जास्त पसंती मिळताना दिसतेय. प्राण्यांशी संबंधित अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात कुत्रा, मांजर, साप, माकड अश्या प्राण्याच्या व्हीडिओंना पसंती मिळताना दिसते. सध्या असाच एका माकडाचा व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. या व्हीडिओत माकड (Monkey video) ती सगळी कामं करताना दिसतोय, जी एखादा मनुष्य करेल. लहान मुलाची काळजी घेणं, लॅपटॉपवर काम करणं, लिहिणं, असं बरंच काही…
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक माकड माणसाप्रमाणे सगळी कामं करतोय. यात तो एका लहान मुलाची काळजी घेतोय. लॅपटॉपवर काम करतोय. वहीवर काहीतरी लिहितोय आणि असं बरंच काही तो करताना पाहायला मिळतोय.
लॅपटॉपवर काम करणं येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे त्यासाठी अभ्यास लागतो. पण एक माकड लॅपटॉपवर काम करताना पाहायला मिळतोय. हा सॉफ्टवेअर इंजीनियर लॅपटॉपव र काम करतोय. तो माऊस हॅन्डल करताना पाहायला मिळतोय. तसंच तो त्याचे स्वत:चेच यूट्यूबवरचे व्हीडिओ पाहातो आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माकडाच्या व्हीडिओत तो वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. या व्हीडिओमध्ये हे माकड सर्वात आधी एका मुलासोबत बेडवर झोपलेलं दिसत आहे. त्यानंतर हा लहानगा आजारी असल्याने तो त्याची काळजी घेतोय. तो त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवतो.
हे माकड एवढ्यावरच थांबत नाही तर ते वहीवर पेनाने काही लिहिताना दिसतोय. त्याच्या त्या चिमुकल्या हातांनी वहीवर उमटणाऱ्या रेषाही खास आहेत.
FUNNY ANIMALS ABU या यूट्यूब चॅनेवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. 19 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलाय. तर साडे आठ हजार लोकांनी लाईक केलाय.