आपल्या हृदयाला स्पर्श करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येतात. गेल्या काही दिवसांत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्ही क्षणभर थक्क व्हाल. हे प्रकरण तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील आहे. इथं अनैवारी धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढली, त्यामुळे परिस्थिती इतकी गंभीर बनली की, एक महिला तिच्या मुलासह धबधब्यात अडकली. त्यानंतर रेस्क्यू टीम कसा जीव धोक्यात घालून आई मुलाचा जीव वाचवण्यासाठी उतरली. आता या रेस्क्यु टीमवर देशभरातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Mother baby who stuck anaivari waterfalls forest rangers who save their life)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका बाजूला पाण्याचा जोरदार प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला निसरडा दगड दिसतो आहे. यावर एक महिला आपल्या मुलासह अडकलेली दिसत. मग दोन लोक शौर्य दाखवतात आणि आई आणि मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात गुंततात. हे लोक त्या निसरड्या खडकावर उतरतात. आई आणि मुलाला वाचवतात, पण परत येताना दोघेही घसरून पाण्यात पडतात. हा क्षण अतिशय भयानक आहे. दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातात. पण सुदैवाने पाण्यात पडल्यानंतर ते दोघेही पोहत किनाऱ्यावर सुखरुप पोहचतात.
पाहा व्हिडीओ:
Brave effort by forest staff while saving life of a mother with infant at #Anaivari waterfalls in #Salem district of #TamilNadu #TNForesters
Via:@Shilpa1308 @supriyasahuias @SudhaRamenIFS pic.twitter.com/TN1maKbWsv— Surender Mehra IFS (@surenmehra) October 26, 2021
हा व्हिडिओ IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेकांनी आई आणि वन अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खरंच! आईपेक्षा या जगात कोणीही नाही.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आमचा सलाम.’ याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही पाहा: