मुलं मोठी होऊ लागली की चुकीच्या संगतीमध्ये येऊन आपली मुलं बिघडू नयेत असं टेन्शन पालकांना येतं. याबाबत पालक आपल्या मुलांना नेहमी समजावण्याचा प्रयत्न करतात, पण काही मुले ऐकत नाहीत. घरात मुलगा असेल तर त्याचे वडील त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर घरात मुलगी असेल तर तिची आई तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करते. असाच काहीसा प्रकार व्हायरल झालेल्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा एका आईने आपल्या मुलीला समजावून सांगितलं की, जगात अशा पुरुषांपासून सावध रहा, नाहीतर तुम्हाला त्यांच्याकडून फसवलं जाऊ शकतं.
आपल्या मुलीला समजावत त्यांनी व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवली. या मेसेज मध्ये आईने आपल्या मुलीला ती ज्या प्रकारे पुरुषांमध्ये मिसळते त्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
हे समजावताना महिलेने मात्र फारच कडक भाषेचा वापर केलाय. त्यावर तिच्या मुलीने होकारार्थी उत्तर दिले. “मुलांबरोबर आणि पुरुषांबरोबर मिसळताना सावधगिरी बाळगा. देशात अनेक अडचणी आहेत, अशी माणसे सर्वत्र उपस्थित आहेत.” आईच्या व्हॉट्सॲप मेसेजवर प्रतिक्रिया देताना मुलीने हो सावध राहणार असल्याचे सांगितले.
see my mum??? pic.twitter.com/tY8xd4k10b
— $teph (@stephfym) October 27, 2022
या नंतर त्या मुलीने आपलं आणि आपल्या आईचं व्हाट्सॲप चॅट शेअर करत कॅप्शन दिलं, “हे बघा माझी आई”. यावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. कुणी तिच्या आईच्या वागण्याचं समर्थन केलं तर कुणी “माझीही हीच अवस्था आहे” असं म्हटलंय.