Video | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच !

| Updated on: Jun 23, 2021 | 4:58 PM

याच पार्श्वभूमीवर सध्या एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने अजगराचा धिरोदात्तपणे सामना केला आहे.

Video | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच !
LEOPARD PYTHON VIRAL VIDEO
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ हे प्राण्यांचे तर काही पक्ष्यांचे असतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून विशेष पसंदी मिळते. याच पार्श्वभूमीवर सध्या एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या अजगरावर चांगलाच रागावला आहे. त्याने अजगरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. (mother leopard defending her childs from python see viral video)

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा खास आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या दिसतो आहे. हा बिबट्या आपल्या पिल्लासोबत जंगलामध्ये चालतो आहे. यावेळी बिबट्याची पिल्लं हे अतिशय आनंदात असून ते खेळत आहेत.

बिबट्याच्या पिल्लांसमोर आला भलामोठा अजगर

मात्र, बिबट्याची पिल्लं जंगलात खेळत असतानाच एक भलामोठा अजगर त्यांच्या समोर आला आहे. समोर आलेला अजगर पाहून बिबट्याची पिल्लं मात्र घाबरली आहेत. बिबट्याच्या पिल्लांनी अजगराला पाहून थेट पळ काढला आहे. आपली पिल्लं घाबरल्याचे समजताच बिबट्या चांगलाच रागावला आहे.

अजगराकडून बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न

त्याने आपली पिल्लं सुरक्षित असल्याचे समजताच समोरच्या अजगरावर चाल करुन जाण्याचा प्रयत्न केला आहे. बिबट्या त्या महाकाय अजगरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अजगरही बिबट्याचा प्रतिकार करताना दिसतो आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

रोमहर्षक संघर्ष सोशल मीडियावर व्हायरल

अजगर आणि बिबट्या यांच्यातील लढाई चांगलीच रोमहर्षक आहे. दोघांनी एकमेकांवर प्रत्यक्ष हल्ला केला नसला तरी एकमेकांवर चाल करुन जाण्यासाठी त्यांनी केलेली तयारी या व्हिडीओमध्ये पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ earthfocus या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नवरी-नवरदेवाचा मोठा निर्णय, दोघांनीही केलं भर मंडपात टक्कल, कारण काय ?

Video | तरुणांनाही लाजवेल असा डान्स, आजोबांचे ठुमके एकदा पाहाच

Video | डोळे, डोके नसलेला माणूस, रहदारीत चालवतोय दुचाकी, व्हिडीओ व्हायरल

(mother leopard defending her childs from python see viral video)