मुंबई : उगवता सूर्याच्या देश जपानमध्ये माउंट एसो (Mount Aso) नावाचा ज्वालामुखीचा (Volcano) उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे ज्वालामुखीची राख 1,500 फुट उंच उडली. हा ज्वालामुखी दक्षिण द्विप क्यूशू या ठिकाणी स्थित आहे. या ज्वालामुखी ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे ते जपानमधील पर्यटन स्थळ आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तेथील पर्यटकांना लांब करण्यात आले.
ज्वालामुखीचा उद्रेक
माउंट एसो (Mount Aso) हा जगातील सर्वात जास्त सक्रिय असणारा ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा एक व्हिडीओसध्या वायरल होत आहे. या व्हिडीओपाहायला मिळत आहे की उद्रेक झाल्यानंतरचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या एका बातमीनुसार बुधवारी हा उद्रेक झाला या उद्रेकमध्ये कोणतीच जीवित किंवा मालमत्तेच नुकसान झाले नाही.
阿蘇山爆発したわ? pic.twitter.com/aU5oRxVM87
— ツカニ♋?ゆかのひと (@tsuka2_) October 20, 2021
मुख्य सचिवांची माहिती
डेली मेलच्या वृत्तानुसार मुख्य कैबिनेट सचिव हिराकाजू मात्सूनो या उद्रेकमध्ये कोणतीच जीवित किंवा मालमत्तेच नुकसान झाले नसून. पोलीस या प्रकरणी काम करत आहेत अशी माहीती दिली. या उद्रेकानंतर ज्वलामुखी जवळ राहणाऱ्या स्थानिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Video: महाकाय अजगर गळ्यात घालून महिलेचा स्टंट, नेटकरी म्हणाले, बाई जपून, अजगराचा भरवसा नाय!
रेल्वे रुळावरील ट्रकचा भीषण आपघात, थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ