प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, तर काही पाहून आश्चर्यही वाटते. सध्या, शेळ्यांशी संबंधित असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये काही शेळ्या केवळ धरणाच्या सरळ भिंतीवर चढताना दिसत नाहीत, तर तुम्ही धावतानाही दिसतील. हे दृश्य खूपच थक्क करणारे आहे. (Mountain goats Climbing on Dam Wall in Italy video goes viral left Netizens Amazed)
या माउंटन गोट्स आहेत, ज्या धरणाच्या शेकडो फूट उंच भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हायरल व्हिडीओची सुरुवात पाहून तुम्हाला बकऱ्यांचे हे काम सोपं वाटेल. पण जेव्हा व्हिडीओमध्ये धरणाचे एरियल व्ह्यू दाखवले जातात, तेव्हा ते किती अवघड आणि धोक्याचे आहे याची कल्पना येईल.
चला हा व्हिडीओ पाहूया.
These mountain goats are climbing the vertical walls of a dam in Italy to get the most essential salts for their survival…
Bye bye gravity.
?BBC pic.twitter.com/CwnMmXt33g— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 25, 2021
IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हे माउंटन गोट्स आहेत, ज्या इटलीतील धरणाच्या सरळ भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिले गेला आहे. तर शेकडो लोकांनी लाइक केला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आणि लिहिले, ‘म्हणूनच मला वाईल्ड लाईफ खूप आवडते.’ त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, ‘अद्भुत … निसर्ग या प्राण्यांना आश्चर्यकारक क्षमता देतो.’ तिसऱ्याने लिहिले, माउंटन शेळ्या या निसर्गाने बनवलेले अद्भुत प्राणी आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच लोक आश्चर्यचकितही झाले आहेत. काही लोकांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे की, हे शेळ्या केवळ धरणाच्या भिंतींवर चढण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यावर धावत आहेत. बर्याच लोकांना हेच आश्चर्यकारक वाटलं, तर काही लोक ते भीतीदायक देखील म्हणत आहेत.
हेही पाहा: