एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात चांगली गोष्ट करू शकते ती म्हणजे त्यांना निरोगी कार्य-जीवन संतुलित करण्यास मदत करणे. हे एक आदर्श असले तरी प्रत्यक्षात ते क्वचितच दिसून येते, कंपन्या फक्तच असं म्हणतात पण नियम मात्र इतके कडक असतात की प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काम करत असताना जागेवरून उठता सुद्धा येत नाही. पण तरीही ही बातमी आनंद देणारी आहे मध्य प्रदेशातील एका आयटी कंपनीने असाच प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय आणि कर्मचारी अत्यंत सुखी आहेत. एका कर्मचाऱ्याने आपल्या स्क्रीनवर चेतावणीचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यावर लिहिले, “तुमची शिफ्ट टाइम संपली आहे. 10 मिनिटांत कार्यालयीन यंत्रणा बंद होईल. प्लीज घरी जा.”
लिंक्डइन वापरकर्त्याने सांगितले की कामाच्या तासानंतर कोणतेही फोन कॉल किंवा ईमेल येणार नाहीत. आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी वाटावे आणि त्यांच्याकडे उत्तम कार्य पद्धती असावी अशी कंपनीची इच्छा आहे.
कमेंट सेक्शनमध्ये ही कोणती कंपनी आहे, जी एवढी सुविधा देत आहे, याची चर्चा लोक करत आहेत. तर अनेकांनी असे काम केल्याने कर्मचाऱ्यांना आनंद होईल, असे सांगितले.
डेस्कटॉप किंवा लॅपटॉप लॉक होण्यापूर्वी डेडलाइन पूर्ण करण्यासाठी खूप दबाव येईल असे काही लोकांना वाटले. एका लिंक्डइन युजरने लिहिले की, “मला इथे काम करताना खूप आनंद होईल. अधिक कार्यक्षम आणि उत्पादक.”
आणखी एका युजरने लिहिले की, “हे फक्त नॉन टेक्निकल लोकांसाठी काम करेल.” मला खूप वेळ बसून काम करावं लागतं, मग मी महत्वाच्या गोष्टी पूर्ण करू शकत नाही कारण माझा लॅपटॉप बंद असेल. हे खूप दडपण आहे.”