खाता खाता जीव गेला… लोक लाइव्ह पाहत होते अन् तरुणीने मान टाकली; असं काय घडलं?

| Updated on: Jul 23, 2024 | 8:06 PM

आयुष्य जगत असताना प्रत्येक माणूस काही ना काही गोष्टी करत असतो. चार पैसे कमावण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. चीनमध्ये एका तरुणीची धडपड तिच्या जीवावरच बेतली. नको तो टास्क कॅमेऱ्यासमोर करायला गेली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना हजारो लोकांनी लाइव्ह पाहिली आणि त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.

खाता खाता जीव गेला... लोक लाइव्ह पाहत होते अन् तरुणीने मान टाकली; असं काय घडलं?
chinese food
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार जिंदगी सेट करत असतो. आपलं शिक्षण आणि प्रतिभेनुसार प्रत्येकजण आपलं मन रमेल आणि जिंदगी जगण्यासाठी पैसेही मिळतील असं क्षेत्र निवडत असतो. ती त्याची चॉईस असते आणि त्यात त्याला आनंद असतो. कोणी अभिनय, कोणी गायन, तर कोणी क्रीडा आदी प्रोफेशन निवडून आपली लाइफस्टाइल तयार करत असतो. सध्या सोशल मीडिया आल्याने लोकांना छंद आणि पैसा कमावण्याचा चसका लागला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरून हा पैसा कमावला जात आहे.

जगभरातील लोकांनी पैसे कमावण्याचे विविध फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. पॅन शाओटिंग (Pan Xiaoting) नावाच्या एक मुलगी अशाच एका छंदामुळे आयुष्यातून उठली. खाता खाता या मुलीचा मृत्यू झाला. ही मुलगी चीनची राहणारी आहे. खाण्याचं लाइव्ह स्ट्रीम करत होती. लोक तिचा खाण्याचं लाइव्ह प्रेक्षेपण पाहत होते. ती खात असतानाच तिचा मृत्यू झाला. लोकांनाही काय झाले ते कळेनाच. पण जेव्हा तिचा मृत्यू झाल्याचं कळलं तेव्हा अनेकांना धक्काच बसला.

खाण्यातून कमवायची

पॅन शाओटिंग एक मुकबांग लाइव्ह स्ट्रीमर करत होती. म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊन लोकांचं मनोरंजन करणारा इन्फ्लूएन्सर. ती आधी वेट्रेस होती. पण अधिकचा पैसा कमावण्यासाठी तिने लाइव्ह स्ट्रीमरचा मार्ग अवलंबला होता. जेव्हा तिची लोकप्रियता वाढली, तेव्हा तिने नोकरी सोडून हाच फुलटाइम धंदा सुरू केला. त्यामुळे तिचं वजन वाढलं. घरच्यांनाही तिची चिंता वाटू लागली. घरच्यांचा विरोध होऊ लागल्याने तिने स्ट्रीमिंग करण्यासाठी स्टुडिओ खरेदी केला. या कामातून तिला चांगला पैसा आणि गिफ्ट्स मिळत होते.

खाताखाता मृत्यू

पॅन शाओटिंगने करिअर वाढवण्यासाठी अधिक आव्हानात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. अनेक अवघड आणि आव्हानात्मक चॅलेंज स्वीकारल्याने तिला अनेकदा रुग्णालयात अॅडमिट व्हावे लागले होते. यावेळीही तिने खाण्याचं लाइव्ह स्ट्रीम केलं आणि तिचा खाता खाता मृत्यू झाला. मृत्यूवेळी तिचं वजन 300 किलो म्हणजे 3 क्विंटल झालं होतं. तिला गॅस्ट्रील ब्लीडिंगच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातून आल्यावर तिने पुन्हा खरतनाक चॅलेंज सुरू केले होते.

ती एका सेशनमध्ये 10 किलो खाद्यपदार्थ खायची. विशेष म्हणजे 10 तास निरंतर खायची. 14 जुलै रोजी अशाच एका सेशनच्यावेळी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलं गेलं नाही. पण तिच्या पोटात न पचलेलं जेवण भरलेलं होतं आणि पोटाच्याखालचा भाग डिफॉर्म झाला होता, असं सांगितलं जात आहे.