सर्वसामान्यांचे लग्न हा बातमीचा विषय नसतो. परंतु काही सामान्यांची लग्नही चर्चेत येतात. मुंबईतील एका युवतीचे लग्न चर्चेत आले आहे. या युवतीने पाकिस्तानी कोट्यधीशसोबत निकाह केला आहे. दोन वेगवेगळ्या देशातील वधू आणि वर असलेले हे लग्न सोशल मीडियावर गाजत आहे. या दोघांनी लग्नानंतर मधुचंद्राचे व्हिडिओ अन् फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील त्यांची लाईफ स्टाईल लोकांना आश्चर्यचकीत करत आहेत. मुंबईतील तारा ढिल्लो हिने पाकिस्तानी उद्योगपती सलीम गौरीसोबत निकाल केला आहे.
मुंबईतील तार ढिल्ला एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. तिचा पाकिस्तानी पती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपनीचा मालक आहे. सलीम गौरी नेटसॉल टेक्नोलॉजी कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे. जगभरात त्याचा व्यवसाय पसरला आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एक-दुसऱ्यांसोबत फिरतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. त्यांची लग्झरी लाईफ स्टाईल पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
tara_tsg या अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंवर युजर कॉमेंट करत आहेत. काही व्हिडिओंना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाल्या आहेत. या कपलने काही रोमांटीक फोटोसुद्धा शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्या सेलिब्रेटीसारखे त्यांना प्रतिसाद मिळत आहे.
दोघांचा वयात मोठा फरक आहे. त्यामुळे अनेक मजेदार कॉमेंट युजर करत आहेत. सलीम गौरीचे वय 54 आहे. त्याचा उल्लेख करत एक युजर म्हणतो, अंटीतर 45 ची दिसत आहे. दुसरा एक जण म्हणतो, भाभी तुमच्या घरात रामू काकाची नोकरी मिळेल का? काही जणांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक युजरने ग्रेट कपल म्हटले आहे तर दुसऱ्यांना अनोख्या अंदाजात आशीर्वाद दिले आहेत.