मुंबईकर खुश! सोशल मीडियावर म्हणे, “पैसा आणि वेळ दोन्ही वाचतंय”

| Updated on: Jan 24, 2023 | 12:44 PM

मुंबईकरांना ही नवी भेट मिळाल्याने बॉलिवूड अभिनेता सुमीत राघवन देखील खूप खूश आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

मुंबईकर खुश! सोशल मीडियावर म्हणे, पैसा आणि वेळ दोन्ही वाचतंय
mumbai metro
Image Credit source: Social Media
Follow us on

नुकतीच मुंबईकरांना मेट्रोच्या रूपाने एक नवी भेट मिळाली आहे. आधीच मेट्रोची सुविधा असली तरी त्या मार्गांवर प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी आता काही नवे मार्ग करण्यात आले आहेत. मुंबई मेट्रोच्या या नव्या सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, ज्यामुळे प्रवाशांना मुंबईच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणे सोपे, किफायतशीर आणि जलद झाले आहे. आता लोक ज्या प्रवासासाठी तासनतास लागतात तो प्रवास काही मिनिटात करू शकतात. मुंबईकर खूप आनंदी आहेत आणि सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे.

मुंबईकरांना ही नवी भेट मिळाल्याने बॉलिवूड अभिनेता सुमीत राघवन देखील खूप खूश आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

नव्या मेट्रोचे फोटो आणि प्रवासादरम्यानचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याशिवाय इतर लोकही ट्विटरवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने ट्विटरवर आपला अनुभव सांगताना एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘बोरिवलीला जाण्यासाठी आज मेट्रो लागली. एरवी इथपर्यंत पोहोचायला दीड तास लागायचे आणि त्याच वेळी रिक्षात सुमारे 200-250 रुपये मोजावे लागत असत, पण मेट्रोतून अवघ्या २० रुपयांत प्रवास केला आणि हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण झाला. मुंबईकरांसाठी हे वरदानच!

 

मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासाचा आनंद घेतला.