मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात 21 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, याच योगदिनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी योगाची उत्त्पत्ती भारत नव्हे तर नेपाळमध्ये झाली आहे, असा दावा केला. ओली यांच्या या दाव्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. (Nepal Prime Minister K P Sharma Oli said Yoga is originated in Nepal not in India social media users trolled him)
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने केपी शर्मा ओली नेपाळमधील बालूवतार येथे एका कार्यक्रमात भाषण करत होते. यावेळी बोलताना त्यांनी योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये झाल्याचे वक्तव्य केले. “जेव्हा योग अस्तित्वात आला तेव्हा भारताचे काहीही अस्तित्व नव्हते. भारत गटागटांमध्ये विभागलेला होता. तेव्हा भारत एक उपद्वीप किंवा उपमहाद्वीप होता,” असे केपी शर्मा ओली ओली म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
Yoga originated in Nepal, not India, claims PM Oli
Read @ANI Story | https://t.co/iZNIR2EBkN pic.twitter.com/n337vnZDMP
— ANI Digital (@ani_digital) June 21, 2021
Nepal’s PM Oli
Earlier: Ram was born in Nepal
Now: Yoga Generated from NepalIndia- pic.twitter.com/TxPOqqXeTo
— India Trending (@IndiaTrendingin) June 21, 2021
He is ryt pic.twitter.com/vXAeZvdCFK
— राहुल रघुवंशी (@raone4016) June 21, 2021
— ??????? ????????007 (@Kkkuldeep007) June 21, 2021
People in Nepal after hearing about their PM’s new claim: pic.twitter.com/Sydu8w9j6B
— vsd (@VSDHAL) June 21, 2021
— शताक्षी (@ShatakshiJ1) June 22, 2021
दरम्यान, केपी शर्मा ओली यांनी याआधीसुद्धा भारतासंबंधी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. त्यांनी “भगवान राम हे नेपाळचे होते. भारतातील अयोध्या ही खरी नाही. नेपाळमध्येसुद्धा अयोध्या नावाचे गाव आहे. तसेच खरी अयोध्या आणि राम जन्मभूमी नेपाळमध्ये आहे,” असे वक्तव्य होते. त्यानंतर त्यांच्या योग दिनानिमित्तच्या नव्या वादग्रस्त विधानानंतर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.
(Nepal Prime Minister K P Sharma Oli said Yoga is originated in Nepal not in India social media users trolled him)