मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्ररणामध्ये चौकशी तसेच तपासणी करण्यासाठी एनसीबीची टीम आज शाहरुख खानचे घर म्हणजेच मन्नतवर जाऊन पोहोचली. यावेळी एनसीबीने शाहरुख खानची मॅनेजर पूज ददलानीला एक नोटीस दिल्याचे म्हटले जात आहे. या नोटिशीत आर्यन खानची शैक्षणिक माहिती तसेच मेडिकल हिस्ट्रीसुद्धा मागण्यात आली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता सोशल मीडियावरील वातावरणदेखील चांगलेच तापले आहे. एनसीबीची टीम मन्नतवर पोहोचल्यामुळे नेटकरी आता शाहरुख खानला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुढे आले आहेत.
नेटकऱ्यांनी फेबसूक, ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर शाररुख खान तसेच मन्नत ट्रेंडिंगला आहेत. तसेच काही नेटकरी एनसीबी टीमच्या कारवाईवरदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकरी तसेच फॅन्सने शाहरुखसाठी प्रार्थना केली आहे. सध्या तुम्ही अडचणीत आहात. पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे एका नेटकऱ्यांने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काही दिवसांनी सगळं काही ठीक होईल, असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच एका नेटकऱ्याने सत्य लवकरच बाहेर येईल असं सांगितलं आहे.
WE LOVE YOU SRK https://t.co/JsMXB7T1wW
— SAIJI’s nabanita ??????????????? (@nabanita_1994) October 21, 2021
NCB became world famous just because of SRK ?
— K♡ (@MeGlaxy_Kavya) October 21, 2021
#ShahRukhKhan is Love ❤️
— Shabnam (@ShabnamKhan000) October 21, 2021
Sub Thik hoga srk sir insha allah
— Waseem Khan (@WaseemK00963465) October 21, 2021
दरम्यान सध्या सोशल मीडियावर #ShahRukhKhan, Mannat हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहेत. तसेच यामध्ये अनन्या पांडेदेखील ट्रेंडिंगवर असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एनसीबीने अनन्या पांडेला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.
इतर बातम्या :
मेळावे आणि चित्रा वाघांना प्रत्युत्तर यापलीकडे चाकणकरांनी महिलांसाठी काय केलं? शालिनी ठाकरेंना सवाल
जुन्या वादातून मित्रांमध्ये राडा, नागपुरात चौघांकडून तरुणाची चाकू भोसकून हत्या
राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन; शनिवारपासून रंगणार सामनेhttps://t.co/ZUazfu2SDK#NationalVolleyballTournament|#NashikSports|#MaharashtraDirectVolleyballAssociation|#NashikDistrictMaharashtraDirectVolleyballAssociation|#DirectVolleyballAssociationofIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021