आईने नारळ फोडायला दिला की आपल्या जीवावर येतं. घरात इडली करायची असली, नारळाची वडी करायची असली की नारळ फोडणं हा एक वेगळा आणि प्रचंड अवघड कार्यक्रम असतो. अनेक वेळा सोशल मीडियावर देशाच्या कानाकोपऱ्यातून असे व्हिडिओ समोर येतात, जे युजर्सना आश्चर्यचकित करतात. यामध्ये अशा व्हिडिओंचा देखील समावेश असतो ज्यात लोक आपली जुगाडू वृत्ती दाखवतात. असाच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक नारळ अशा प्रकारे फोडण्यात आलाय की समस्त नारळ फोडण्याचं काम असणाऱ्या कार्यकर्त्यांना ही चांगलीच सोय झालीये.
हा व्हिडिओ एका युजरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे तंत्रज्ञान देशाबाहेर जाऊ नये, असे कॅप्शन देण्यात आले आहे.
या व्हिडीओमध्ये एक लिफ्ट उघडी असल्याचं दिसून येतं ती बंद होणार इतक्यात एक व्यक्ती मध्येच नारळ आणून ठेवते. हा नारळ प्लास्टिकच्या पिशवीत असतो.
लिफ्ट बंद होताच ते प्लॅस्टिकच्या पिशवीत असणारं नारळ वरच्या दिशेने जातं आणि मग त्यानंतर जे काही होतं ते व्हायरल झालंय.
नारळ जसं लिफ्टच्या वरच्या भागावर जाऊन आदळतं. त्याचे लगेच तुकडे होऊन त्याचे दोन भाग पडतात. यानंतर नारळही खाली पडतो.
व्हिडिओ पोस्ट होताच तो प्रचंड व्हायरल झाला. त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले की, हे तंत्रज्ञान खरोखरच देशाबाहेर जाऊ नये.