कुठलाही सण असो कुठलाही कार्यक्रम असो, भारतात चांगल्या जेवणाशिवाय सारं काही अपूर्ण आहे. एखाद्या विशेष दिवशी आपण काय कपडे घालायचे हे लोकांचं ठरलेलं नसतं पण त्या दिवशी आपण काय खायचं हे मात्र लोकं फार आधीच ठरवून मोकळे होतात. खाण्यावर लोकांचं प्रेमच तितकं आहे. या प्रेमावर स्विगी, झोमॅटो फूड पांडा सारख्या ऑनलाइन फूड डिलीव्हरी कंपनीने चार चांद लावलेत. यामुळे कुठे काय जायचे कष्ट घ्यायचे नाही. जे हवं ते बसल्या बसल्या ऑनलाइन मागवायचं. आता एवढ्या सगळ्या सोयी सुविधा असताना लोकांनी न्यू ईयरच्या पार्टीत किती तो धिंगाणा घातला असेल बरं. अहो एका डिशच्या स्विगीला अक्षरशः साडेतीन लाखांहून अधिक ऑर्डर्स मिळाल्यात. सांगा बरं ती कोणती डिश असेल?
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर 2022 ला लोकांनी एक डिश इतक्या मोठ्या पप्रमाणावर मागवली की तुम्हाला सुद्धा वाचून धक्का बसेल. स्विगीने एक डेटा जारी केलाय ज्यात या रात्री कुठल्या डिशची किती संख्येने मागणी होती हे सांगण्यात आलंय.
यात जवळजवळ सगळ्याच डिशची ऑर्डर मोठ्या संख्येने होती. पण त्यातही एक डिश अशी होती जिने बहुधा रेकॉर्ड ब्रेक केला असावा. सांगा अशी कोणती डिश असू शकते जी कोणताही भारतीय अगदी देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आवडीने मागवू शकतो?
बिर्याणी! होय. नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्विगीने साडेतीन लाख बिर्याणीच्या ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये. भारतातल्या बहुतेक ऑर्डर्स बिर्याणीसाठी होत्या.
विशेष म्हणजे हा आकडा शनिवारी रात्री 10.25 वाजेपर्यंतचा आहे. याचा अर्थ असा की हा आकडा त्यानंतरही वाढतच गेला असणार. भारतातले लोक बिर्याणीसाठी किती वेडे आहेत नाही? हा आकडा आश्चर्यचकित करणारा आहे.
1.76 lakh packets of chips ordered on @SwiggyInstamart as of 7 pm ? i’m just hoping y’all have enough room left for the 1.56 lakh biryanis that’s also been delivered
— Swiggy (@Swiggy) December 31, 2022
स्विगीच्या बिर्याणीशिवाय इतरही अनेक गोष्टी लोकांनी मोठ्या संख्येने मागवल्या होत्या. यामध्ये पिझ्झासाठी 61 हजार ऑर्डर्स आल्या आहेत. पीटीआयच्या म्हणण्यानुसार स्विगीने यासाठी आपल्या ट्विटरवर एक पोलही चालवला होता.
यातील 75.4 टक्के ऑर्डर हैदराबादी बिर्याणीसाठी मिळाल्या होत्या. त्यानंतर लखनवी बिर्याणीला सर्वाधिक आणि कोलकात्याला सर्वाधिक 10.4 टक्के ऑर्डर्स मिळाल्या. 3.5 लाखांपैकी 1.65 लाख बिर्याणीची ऑर्डर कंपनीला 7.20 वाजेपर्यंत मिळाली होती.
यात एक धक्कादायक आकडा आणखीन समोर येतो. हैदराबादमधील अव्वल बिर्याणी रेस्टॉरंट असलेल्या शेफने नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी 15 हजार किलो बिर्याणी बनवली होती.
by the way Bawarchi is prepping 15,000 kgs of biryani this new year’s eve ?
— Swiggy (@Swiggy) December 31, 2022
नववर्षाच्या पूर्वसंध्येला बिर्याणीला सर्वाधिक मागणी राहिली. याशिवाय 1.76 लाख चिप्सची पाकिटेही वितरित करण्यात आली होती. ही आकडेवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंतची असल्याचं सांगण्यात येतंय. ऑर्डरमध्ये ड्युरेक्स कंडोमची 2,757 पाकिटेही वितरित करण्यात आली.
विशेष म्हणजे नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतातील लोकांनी मोठ्या प्रमाणात खिचडी सुद्धा मागवली. कंपनीला खिचडीच्या 12 हजार 344 ऑर्डर्स मिळाल्या होत्या.
तर अशी ही नववर्षाची पूर्वसंध्याकाळ भारतातल्या लोकांनी चांगलीच एन्जॉय केलीये. आकडे बघून तरी असं म्हणायला हरकत नाही. हो ना?