सोशल मीडियावर तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. काही गोष्टी अशा असतात, ज्या तुमच्या हृदयात नेहमीच्या कोरल्या जातात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आधी थोडं विचित्र वाटेल, पण यामागची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही सुखद धक्का बसेल. या फोटोमध्ये आरोग्य कर्मचारी नवजात बालकाला पोलिओ डोस देत आहे. आणि हे तान्हं बाळ एका पातेल्यात ठेवण्यात आलं आहे. (newborn-baby-floating-in-cooking-pot-for-polio-dose-in-west-bengal-see-viral-photo-sundarban)
भारतात अजूनही पोलिओ अभियान मोठ्या प्रमाणावर केलं जातं. प्रत्येक तान्ह्या बाळापर्यंत पोहचण्याचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रयत्न सुरु असतो. एकही मुलगा सुटू नये हा आरोग्य विभागााचा प्रयत्न आहे. यासाठीच आरोग्य कर्मचारी ऊन, वारा, पाऊस आणि पूर या सर्व परिस्थितींशी लढा देत ते घरोघरी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना जीवनाचे दोन थेंब म्हणजेच पोलिओ डोस देत असतात. आताचा व्हायरल होणारा हा फोटो पश्चिम बंगालमधील सुंदरबनमधील असल्याचं सांगितलं जात आहे, जिथं हे आरोग्य कर्मचारी पुरात अडकलेल्या बाळांनाही पोलिओचा डोस देत आहेत. या फोटोत तुम्ही एका नवजात बाळाला एका भांड्यात ठेवलेलं पाहू शकता.
पाहा फोटो:
Happened at Singheshwar village, under Canning 2 block on Sunday. Mom was not fit to move under flood water. Dad also feared to carry the 15-days old baby.
— Sk Badirudin (@skbadiruddin) September 27, 2021
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आधी लोकांना कळालंच नाही की या बाळाला पातेल्यात का ठेवलं. तर याचं कारण आहे या बाळाची आई. बाळाच्या आईची तब्येत खराब असल्याने आणि पुराने वेढा दिल्याने ती बाळाला पोलिओ डोस देण्यासाठी घेऊ येऊ शकत नव्हती. दुसऱ्या बाजूला या बाळाच्या वडिलांना बाळ तान्हं असल्यानं त्याला हाताळणं अवघड वाटत होतं. शेवटी ज्या प्रमाणे कृष्णाला नदी पार करण्यासाठी वसुदेवाने जशी टोपल्यात घेऊन नदी पार केली होती, त्याच प्रमाणे या पित्याने मुलाला या पातेल्यात बसवलं आणि पोलिओ डोस देण्यासाठी आणलं.
दिल्ली एम्सचे डॉक्टर योगीराज राय dIddocYogiraj यांनी हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘गंगेच्या डेल्टा सुंदरबनमध्ये पल्स पोलिओ लसीकरण. आरोग्य सेवा कर्मचारी एवढ्या पुरातही भागात अथक परिश्रम घेत आहे. ट्विटर युजर @skbadiruddin च्या मते, हा फोटो रविवारचा असून सिंघेश्वर गावात काढण्यात आला आला. या बाळाच्या आईला पुराच्या पाण्यात चालता येत नव्हते. अशा परिस्थितीत, नवजात मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी, वडिलांनी मुलाला पातेल्यात ठेवलं आणि डोस देण्यासाठी पोहचले.
हेही पाहा: