मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील मोजकेच असे व्हिडीओ असतात जे चर्चेचा विषय ठऱतात. सध्या तर नवरी-नवरदेवाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी या नव्या जोडीची वाहवा करत आहेत. त्यांनी आपल्या आईला धीर मिळावा म्हणून स्वत:चे केस कापून घेतले आहेत. (newly married bride and groom cut their hair to support their mother suffering from cancer)
सध्या व्हायरल होणार व्हिडीओ हा खास आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव दिसत आहेत. ते दोघेही अतिशय़ आनंदात आहेत. मात्र, नवरीची आई ही कर्करोगाचा सामना करते आहे. याच कारणामुळे या नव्या जोडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या आईला कर्करोगाविरोधात लढा देण्यास बळ मिळावं म्हणून स्वत:च्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढले आहेत.
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला नवरदेव हा खुर्चीवर बसल्याचे दिसतोय. तर नवरी हातात माईक घेऊन बोलत आहे. त्यानंतर या व्हिडीओमध्ये नवरदेवाने बार्बरकडून आपल्या डोक्यावरचे केस कापून घेतले आहेत.
त्यानंतर नवरी खुर्चीवर बसली आहे. तिचेसुद्धा केस कापण्यात येत आहेत. नवरदेव स्वत:तिचे केस कापतो आहे. विशेष म्हणजे नवरीचे लांब लांब केस कापत असताना त्या दोघांना कसलही दु:ख होत नाहीये. उलट नवरी हसत हसत सगळ्यांकडे पाहते आहे.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील असून नवरीचे नाव जॉनी ली (Johny Lee) असे आहे. या दोघांनीही हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या अतिशय व्हायरल होत आहे. लोक व्हिडीओला पाहून या नव्या जोडीची वाहवा करत आहेत. तसेच त्यांच्या या निर्णयबाद्दल त्यांचे अभिनंदनसुद्धा करत आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :
Video | तरुणांनाही लाजवेल असा डान्स, आजोबांचे ठुमके एकदा पाहाच
Video | राजस्थानी महिलेचा घराच्या छतावर जलवा, हुबेहुब गोविंदासारखं थिरकण्याचा प्रयत्न
(newly married bride and groom cut their hair to support their mother suffering from cancer)