मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये जिथे पाय ठेवायला जागा नसते, तिथे एखादा ग्रुप डान्स करतो यावर क्वचितच कुणाचा विश्वास बसेल? पण असं झालं असून हा व्हिडिओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नॉर्वेच्या प्रसिद्ध डान्स ग्रुप ‘क्विक स्टाईल’ने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओवर त्यांचे भारतीय चाहतेही जाम खुश झालेत आणि
काला चष्मा’ हे गाणं ट्रेंडमध्ये आणून संपूर्ण जगाला उड्या मारायला लावणारे परदेशी डान्सर्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. नॉर्वेजियन डान्स ग्रुप ‘क्विक स्टाईल’ने मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालू लागला आहे. व्हायरल क्लिपमध्ये नॉर्वेजियन डान्स ग्रुप ‘लेके पहला पहला प्यार’ या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवर जोरात डान्स करताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे आणि ते त्याचा खूप आनंद घेत आहेत.
कोरियन डान्स ग्रुप ‘क्विक स्टाइल’ने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. त्याने #mumbai या हॅशटॅगला कॅप्शन देत लिहिले #quickstyle, “भारताच्या मुंबई लोकल ट्रेनवर आमचे पहिले पाऊल.” हा व्हिडिओ नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की, आतापर्यंत 5.3 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे, तर अनेक भारतीयांनी कमेंट करत आपले प्रेम लुटले आहे.
एका युजरने लिहिलं, “अरे भाऊ, तुम्ही भारतात कधी आलात?” तर आणखी एका युजरने आश्चर्यकारक कमेंट केली आहे की, “गर्दीच्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये तुम्हाला एवढी रिकामी जागा कशी मिळाली? आणखी एका युजरने लिहिले की, “मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की मुंबई लोकल ट्रेनचा हा डबा नेमका होता कुठचा ? याशिवाय मुंबईतील आणखी एका स्टेशनवर कोरियन ग्रुपला डान्स करण्याची विनंतीही नागरिकांनी केली आहे.