आजच्या युगामध्ये एखाद्या व्यक्तीला जर सोशल मीडिया (Social Media) म्हणजे काय? त्याचा वापर कसा करतात किंवा स्मार्ट फोन म्हणजे काय हे माहिती नाही असे म्हणणे जरा अतिशयोक्ती ठरेल. मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांचा अजून सोशल मीडियाशी संबंध आलेला नाही. यातील एक आहेत मलावीयन संगीतकार गिड्डेस चालमांडा (Giddes Chalmanda) 92 वर्षीय चालमांडा हे दक्षिणी मालावीच्या चिराडझुलू परिसरातील माडझुवा गावात राहातात. त्यांना सोशल मीडियाबद्दल फारसे काही माहित नाही. मात्र तरी देखील त्यांचे संगीत टिकटॉक सारख्या समाज माध्यमांवर प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचे व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले आहेत. चालमांडा हे बँजो वाजवतात. त्यांचे हे मलावीयन संगीत जगभरात पोहोचविण्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.
याबाबत बोलताना चालमांडा सांगतात की, माझे वय सध्या 92 वर्षांचे आहे, मी बँजो वाजवतो. मी जेव्हा बँजो वाजवत असतो, तेव्हा ते संगीत ऐकण्यासाठी माझे मित्र आणि नातेवाईक इथे येतात. त्यातील अनेकजण त्याचे चित्रिकरण करतात. व तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतात. माझ्या व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असल्याचे माझ्या नातेवाईकांनीच मला सांगितले. त्यानंतर माझा उत्साह आणखी वाढला. माझे संगीत सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचत असल्याचे समाधान वाटत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान चालमांडा यांनी गेल्या वर्षी टिकटॉकवर एन्ट्री केली. त्यांच्या नातवाने त्यांच्या संगिताचे काही व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर त्याने हे व्हिडीओ टिकटॉकवर टाकले. हे व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरले. लोक मलावीयन संगित आवडीने ऐकू लागले. अवघ्या वर्षभरातच चालमंडा यांचे व्हिडीओ 80 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहेत. याबाबत बोलताना त्यांचा नातू म्हणाला की मी देवाचे आभार मानतो की, माला असे आजोबा मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ जग आज त्यांचे संगीत ऐकत आहे.
Video | सेल्फीसाठी जीव धोक्यात! नदीत बुडत असलेल्या गाडीवर उभा राहून महिलेने घेतला सेल्फी