आजोबांचा डान्स बघून भलेभले चक्रावले! मित्रांसोबत, ‘उड़ें जब जब जुल्फे तेरी’

| Updated on: Jul 25, 2023 | 12:05 PM

वयस्कर लोकं पण कमाल असतात हे कधी काय करतील याचा भरवसा नसतो. अगदी दिलखुलास पणे जगतात. कधी कुठल्या आजी कुठच्या मिरवणुकीत नाचत असतात, तर कधी एखादे आजोबा रस्त्यावर उतरून मनसोक्त नाचत असतात. यात काही वयस्कर लोकं फार कूल असतात.

आजोबांचा डान्स बघून भलेभले चक्रावले! मित्रांसोबत, उड़ें जब जब जुल्फे तेरी
Old age uncle dancing on ude jabb julfe teri
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: वय हा फक्त आकडा असतो! हे वाक्य खरं करणारे अनेक व्हिडीओ आपण पाहतो, हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. वयस्कर लोकं पण कमाल असतात हे कधी काय करतील याचा भरवसा नसतो. अगदी दिलखुलास पणे जगतात. कधी कुठल्या आजी कुठच्या मिरवणुकीत नाचत असतात, तर कधी एखादे आजोबा रस्त्यावर उतरून मनसोक्त नाचत असतात. यात काही वयस्कर लोकं फार कूल असतात. अशी व्हायरल होणारी लोकं आपल्याला जगायचं कसं हेच नकळत शिकवत असतात. आता हे आजोबाच बघा. यांचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हे आजोबा त्यांच्या मित्रांसोबत ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ या गाण्यावर नाचतायत.

पार्कमध्ये वृद्ध व्यक्तीने केला डान्स

कंटेंट क्रिएटर विजय खरोटे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती ‘उड़ें जब जब जुल्फे तेरी’ या गाण्यावर डान्स करताना खूप खुश दिसत आहे. गाणं वाजताच त्यातील एक जण उभा राहतो आणि आपल्या मित्रांसोबत नाचायला लागतो. त्यांचा हा डान्स लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे. प्रत्येकजण या कामगिरीचे कौतुक करत आहे.

या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंट बॉक्समध्ये लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका युजरने लिहिलं, ‘अप्रतिम’, दुसऱ्या युजरने त्याचं कौतुक करत लिहिलं की, “प्लीज असंच हसत राहा.” एकाने लिहिले की, “तुम्हा सर्वांना आनंदी पाहून खूप आनंद होत आहे.