Funny video : अनेक वेळा एखादी व्यक्ती स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेते. म्हणजे सगळे चांगले सुरू असते. मात्र स्वतःहून असे काहीतरी करायचे, आणि त्रास ओढवून घ्यायचा. ती म्हण आहे ना आ बैल मला मार… ही म्हण सिद्ध करणारा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. ज्यात एका आजोबाला कारण नसताना बैलाला मारणे महागात पडते. वाटेला जाणाऱ्या आजोबांना बैलानेही आपल्या ताकदीचा असा नमुना दाखवला, की त्या आजोबांनी परत कधीही वाटेला जाऊ नये. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक बैल शांतपणे कोपऱ्यात उभा आहे, यादरम्यान एक आजोबा काठी घेऊन जात आहे. त्यांच्या हातात एक काठी आहे ज्यांनी ते बैलाला मारतात. काठीचा मार लागताच बैल त्या व्यक्तीकडे वळला आणि त्याला शिंगाने मारले.
या हल्ल्यामुळे तो वृद्ध हवेत उडून गेला. यानंतर तो धपकन् खाली पडला. ही क्लिप पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत, की आ बैल मला मार ही म्हण कशी आली, हे आजोबांनी सांगितले आहे. हा व्हिडिओ अधिकारी सुशांत नंदा (IFS) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यात ‘झटपट कर्म’ असे कॅप्शन दिले आहे, बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 22 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Instant karma ? pic.twitter.com/oCftKB5cPY
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 16, 2022
एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की ‘आ बैल मुझे मार… प्रकृति से खिलवाड़ का नतीजा…’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘गरीब बैल शांतपणे उभा होता, मग त्याला मारण्याची काय गरज होती?’ यूझरने लिहिले, ‘कोणतेही शत्रू नसतात, आम्ही स्वतःला बनवतो! याशिवाय इतरही अनेक यूझर्स आहेत, ज्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.