मुंबई : वय कितीजरी वाढलं तरी आपल्यातील जोश जिवंत ठेवणारे काही लोक आपल्या भोवताली असतात. त्यांच्यातील उर्जा पाहून कधीकधी तरुणांनाही लाज वाटते. सध्या असाच एक दमदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये एक म्हातारा माणूस आपल्या सहकाऱ्यांसोबत अतिशय़ भारदस्त असा डान्स करत आहेत. (old man dancing energetically video went viral on social media)
व्हिडीओमध्ये काय आहे ?
असं म्हणतात की एखादी गोष्ट मनातून करावीशी वाटत असेल तर त्याला वयाची मर्यादा राहत नाही. इच्छाशक्ती असेल तर आपण ती गोष्टी करु शकतो. हे गृहितक एका वयस्कर माणसाने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर माणूस डान्स करताना दिसतोय. या माणसाची डान्स करतानाची उर्जा अतशिय स्फूर्तीदायक आहे. गाण्याच्या तालावर हा माणसू ठेका धरतो आहे. त्याने घेतलेले ठुमकेसुद्धा अतिशय उत्साहवर्धक आहेत.
या माणसाचा डान्स पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. लोक या माणसाचा डान्स आवडीने पाहत आहेत. या माणसासोबत इतरही काही लोक डान्स करत आहेत. मात्र, स्टाईलीश कपडे घालून तरुणांनाही लाजवेल असा डान्स करणारा पिवळसर कपड्यांतील माणूस सर्वांचे आकर्षण ठरला आहे.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे कमेंट्स करत आहेत.
इतर बातम्या :
Video | डोळे, डोके नसलेला माणूस, रहदारीत चालवतोय दुचाकी, व्हिडीओ व्हायरल
Video | राजस्थानी महिलेचा घराच्या छतावर जलवा, हुबेहुब गोविंदासारखं थिरकण्याचा प्रयत्न
(old man dancing energetically video went viral on social media)