मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हारल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण चांगलेच थक्क होऊन जातो. म्हाताऱ्या आजोबांचे काही व्हिडीओ तर आपल्याला अचंबित करुन जातात. सध्या अशाच एका अजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा चक्क शास्त्रीय संगीत गात आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अप्रतिम आहे. कोणामध्ये काय प्रतिभा दडलेली आहे, हे सांगता येत नाही असं म्हणतात. आपल्या देशात तर प्रत्येक माणसामध्ये एखादीतरी कला दडलेली आहेच. सध्या व्हायरल होत असलेले आजोबा तर चक्क शास्त्रीय संगीत गात आहेत. त्यांचा पहाडी आवाज ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध होत आहेत. तसेच त्यांनी केलेलं सादरीकरण अतिशय दमदार असल्याचंही काही नेटकरी म्हणत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आजोबा उभे आहेत. कसलाही बडेजाव न मिरवता उभं राहून ते गाणं गात आहेत. विशेष म्हणजे ते गात असताना बाकीचे लोक आवडीने शातंपणे ऐकत आहेत. काही लोक मध्येच दाद देताना दिसतायत. ते एक शास्त्रीय संगीत गात आहेत. कसलाही संकोच न करता ते गात आहेत. विशेष म्हणजे गाणं गाताना ते कुठेही अडथळत नाहीयेत. त्यांची हीच खाशियत लोकांना आवडली आहे.
पाहा व्हिडीओ :
Wow! And requires no accompanying musical instrument. Salute the talent. pic.twitter.com/vKzQZ73751
— Aviator Anil Chopra (@Chopsyturvey) October 4, 2021
नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर केला आहे. तर काही लोकांनी आश्चर्यकारक अशा कमेंट्स केल्या आहेत. एका आजोबांनी अतिशय अवघड असे शास्त्रीय संगीत गायल्यामुळे लोक अवाक् झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ तुम्हाला @Chopsyturvey या ट्विटर अकाऊंटवर पाहायला मिळेल.
इतर बातम्या :
T20 World Cup 2021 च्या सामन्यांना प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत मोठा निर्णय, ICC ने दिली माहिती
VIDEO: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला हा प्रँक पाहाच!
(old man singing classical song video went viral on social media)