कानपूर | 30 डिसेंबर 2023 : मृत्यू ही गोष्ट कुणालाही नकोशी वाटते. त्यामुळे प्रत्येकजण मृत्यूला घाबरत असतो. एवढेच काय याच भीतीतून लोक स्मशानभूमीतही कधी जात नाही. स्मशानात जळणाऱ्या चिता आणि कुटुंबीयांचा आक्रोश… यामुळे संपूर्ण वातावरण भीतीदायक होतं. पण अशाही परिस्थितीत स्मशानभूमीत कोणी झोपलं तर? ऐकूनच धक्का बसला ना? पण हे खरं आहे. एक व्यक्ती चक्क स्मशानात जळत्या चितेजवळच झोपला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी ऐकून अनेकांच्या अंगावर सर्रकन काटा आला. पण परिस्थिती कळल्यानंतर काळीज पिळवटून गेलं. असं काय घडलं? हा वयोवृद्ध माणूस स्मशानात का झोपला?
ही बुजुर्ग व्यक्ती जळत्या चितेजवळ झोपली. स्मशानभूमीत कोणी नव्हते. हा माणूस एकटाच होता. किर्र अंधार आणि जळणारी चिता… आसपास कोणीच नाही. माणसांचा आवाजही नाही. अशा भयाण जागेवर हा बुजुर्ग माणूस एकटाच झोपला. अख्खी रात्र चिता जळत होती अन् हा माणूस डाराडूर झोपला होता. कसलही भीती नाही, चिंता नाही. लोक रात्री सोडा दिवसाही स्मशानभूमीकडे फिरकत नाहीत.
स्मशानभूमीच्या जवळून जातानाही देवाचं नाव तोंडात असतं. फक्त अंत्ययात्रेच्यावेळीच लोक स्मशानभूमीत जातात, असं असताना एक व्यक्ती रात्रभर जळत्या चितेजवळ झोपल्याने आश्चर्य वाटत आहे. एखादी व्यक्ती जळत्या चितेजवळ कशी काय झोपू शकते? असा सवाल केला जात आहे. या माणसाला भीती वाटली नाही का? असंही विचारलं जात आहे.
या व्यक्तीचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कोहना पोलीस ठाणे परिसरातील भैरव घाटचा आहे. देभरात अनेक राज्यात थंडीची लाट आहे. कानपूरही थंडीने गारठलं आहे. कानपूरमध्ये कमाल तापमान 8 ते 9 डिग्री सेल्सिअस आहे. या व्यक्तीला घर नाही. त्याच्याकडे फक्त एक पातळ कांबळ आहे. पण थंडी एवढी की तो व्यक्तीने गारठून गेला होता. त्यामुळे त्याला जळत्या चितेचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. जळत्या चितेच्या ऊबेमुळे थंडी पळालीच. शिवाय एक रात्र कशीबशी काढता आल्याचं समाधान या व्यक्तीला वाटतंय.
या व्यक्तीला झोपलेलं पाहून काही लोकांनी हा व्हिडीओ काढला. तुम्ही जळत्या चितेजवळ का झोपला? तुम्हाला भीती वाटली नाही का? असा सवाल या व्यक्तीला विचारण्यात आला. त्यावर या व्यक्तीने दिलेलं कारण काळीज चिरणारं होतं. थंडी प्रचंड आहे. माझ्याकडे पातळ कांबळ आहे. त्यात निभाव लागत नव्हता. मला घर नाही. मग अशावेळी रस्त्यावर गारठून मेलो असतो. त्यामुळे मला ही जळती चिता दिसली. म्हणूनच ऊब मिळावी म्हणून मी या जळत्या चितेजवळ झोपलो, असं या व्यक्तीने सांगितलं. तेव्हा अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलं होतोय.
Watch this irony
An old man found warmth & comfort beside the burning mortal remains on pyre in Kanpur’s Bhairav ghat.#Winter #UttarPradesh pic.twitter.com/PeS5Cc4XUd
Video credit : @dileepsinghlive
— Arvind Chauhan 💮🛡️ (@Arv_Ind_Chauhan) December 30, 2023