अनेकांना आश्चर्य वाटेल, जगातला सर्वात जुना ऑप्टिकल भ्रम तामिळनाडूतील ऐरावतेश्वर मंदिरात कोरला गेला होता. आश्चर्याबरोबरच भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आपण अनेक प्रकारचे ऑप्टिकल भ्रम सोडवले असतील. पण यातली बहुतांश चित्रे एकतर परदेशी चित्रकारांनी काढलेली असतील किंवा परदेशी छायाचित्रकारांनी चित्रित केलेली छायाचित्रे असतील.
हा फोटो काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुमचं डोकं फिरेल. कारण हे आहेच गोंधळून टाकणारं! हे शिल्प तामिळनाडूतील एका मंदिरातील आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला दोन प्राणी दिसतील. कधी कधी तुम्हाला तो बैल दिसला असेल, तर कधी तुम्हाला तो हत्ती दिसत असेल. हे शिल्प एंबिगुअस ब्रेन टीजर (Ambiguous Brain Teasers) चे प्राचीन उदाहरण आहे.
तुम्ही पाहिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला आधी काही दिसतंय? यात एक बैल आणि एक हत्ती आहे. बैलाने आणि हत्तीने एकच डोकं शेअर केलंय.
डाव्या बाजूला असलेल्या प्राण्याचे शरीर व पाय काढले की उजव्या बाजूचा प्राणी हत्तीसारखा दिसतो. त्याचबरोबर हत्तीचे शरीर व पाय काढले तर उरलेला भाग बैलासारखा दिसतो.
चोला आर्किटेक्चरचा हा अप्रतिम आर्ट पीस ९०० वर्षे जुना असल्याचे म्हटले जाते. ऑप्टिकल भ्रम आपली दिशाभूल करण्यासाठीच असतात. ते अशा प्रकारे दिशाभूल करतात की आपला मेंदू एखाद्या निष्कर्षापर्यंत लवकर पोहोचत नाही.
जसे की ही कलाकृती पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडत आहे. पटकन कळतच नाही फोटोत नेमकं आहे काय. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.