Stunt funny video : तरुणांमध्ये नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची हौस आहे. हे करत असताना अनेक वेळा लोक आपला जीव पणाला लावतात. इतकेच नाही तर अनेकांना जीवही गमवावा लागतो. स्टंट दाखवणे हे प्रत्येकाच्या कक्षेत येणारा विषय नाही. लोक यासाठी कठोर परिश्रम करतात आणि मग ते एखाद्या गोष्टीत परिपूर्ण होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. जे पाहून, अशा धोकादायक (Dangerous) स्टंटचा प्रयत्न करणार्या व्यक्तीवर हसायचे की काय करायचे हे तुम्हाला समजणार नाही. अनेकदा तुम्ही पाहिले असेल, की अभिनेते चित्रपटात असे स्टंट करतात, जे पाहून खूप आश्चर्य वाटते आणि लोकही त्यांच्यापासून प्रेरित होऊन हे स्टंट करू इच्छितात. आता हा व्हिडिओ बघा. फक्त एक माणूस जॉन अब्राहमसारखा बसमध्ये लटकून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळाने त्याचे काय होते हे पाहून, तुम्हाला हसायला येईल. तो पुन्हा असे स्टंट करण्याबद्दल कधीच विचार करणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक व्यक्ती बसच्या गेटला विरुद्ध दिशेने लटकताना दिसत आहे, त्याला त्याच्या स्टंटने एखाद्याला इम्प्रेस करायचे आहे, असे वाटते. तो वेगाच्या विरुद्ध दिशेने बसच्या गेटला लटकलेला दिसतो. अशा स्थितीत त्या व्यक्तीचे डोके वाटेत येणाऱ्या एका फलकाला धडकताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ stefano_ricci_16 इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्यक्तीचे हे कृत्य पाहिल्यानंतर लोकांचा संतापही दिसून येत आहे. त्याचबरोबर काही लोक व्हिडिओचा आनंदही घेत आहेत. काही यूझर्सचे म्हणणे आहे, की असे करून तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत आहात, तर काहींनी असे म्हटले आहे, की केवळ व्यावसायिक लोकांनीच असे काम केले तर चांगले आहे.